अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट… विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ

| Updated on: Jul 13, 2026 | 1:13 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर त्यांच्या सून गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात अनेक गंभीर आऱोप केले होते.

या सर्व आरोपांवर आज विनायक राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांनी आरोप फेटाळून लावत आर्थिक मागण्यांमुळे हा वाद निर्माण झाल्याचा दावा केला. “आधी दोन बेडरूम मागितले. नंतर दोन कोटी रुपयावरून पाच कोटी मागितले. आता 10 कोटीची मागणी केली आहे,” असे विनायक राऊत म्हणाले.

तसेच, “स्त्रीधन सासरी किती आणलं आणि जाताना किती घेऊन गेले हे हिंमत असेल तर सांगावं. तिला जे मिळालं ते तिचं नशीब. आम्हाला त्यात पडायचं नाही. जे मिळालं त्यात त्यांनी सुखी राहावं,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Published on: Jul 13, 2026 1:13 PM
Follow Us