Badlapur Rain | बदलापुरात पेट्रोल पंपाला पाण्याचा वेढा

Badlapur Rain | बदलापुरात पेट्रोल पंपाला पाण्याचा वेढा

| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 2:56 PM

गेल्या २४ तासांपासून बदलापूर शहर आणि परिसरात आलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली.

गेल्या २४ तासांपासून बदलापूर शहर आणि परिसरात आलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे रमेशवाडी, हेंद्रेपाडा, बॅरेज रोड या परिसरात तब्बल तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. या पुराचा फटका बदलापूर शहरातील उल्हास नदी किनारी असलेल्या पेट्रोल पंपाला देखील बसला. या पेट्रोल पंपावर तब्बल तीन ते चार फूट पाणी साचलं होतं. तर या भागातल्या घरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. यामुळे नागरिकां मोठं नुकसान झालं. तर बदलापूर शहराकडून बदलापूर गावाकडे जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेल्यामुळे बदलापूर शहराचा बदलापूर गावाशी अनेक तास संपर्क तुटला आहे.