Pandharpur Rain : चंद्रभागेच्या पुरामुळे पंढरपूरातील मंदिरं पाण्याखाली… नदीकाठच्या गावांना अलर्ट
उजनी धरणातून भीमा नदीत 90,000 क्युसेक, तर वीर धरणातून निरा नदीत 10,000 क्युसेक वेगाने पाणी चंद्रभागा नदीत सोडले जात आहे. यामुळे चंद्रभागा नदीला सव्वा एक लाख क्युसेकचा महापूर आलेला पाहायला मिळत आहे. या महापुरामुळे चंद्रभागा नदीच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. चंद्रभागा नदीवरील ब्रिटिशकालीन पूलही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर नदीकाठावरील […]
उजनी धरणातून भीमा नदीत 90,000 क्युसेक, तर वीर धरणातून निरा नदीत 10,000 क्युसेक वेगाने पाणी चंद्रभागा नदीत सोडले जात आहे. यामुळे चंद्रभागा नदीला सव्वा एक लाख क्युसेकचा महापूर आलेला पाहायला मिळत आहे. या महापुरामुळे चंद्रभागा नदीच्या पात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. चंद्रभागा नदीवरील ब्रिटिशकालीन पूलही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर नदीकाठावरील 13 घाट आणि भाविकांसाठी इस्कॉनने बांधलेला मोठा घाटही पूर्णपणे जलमय झाला आहे.
नदीच्या वाढत्या पातळीमुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास, हे पाणी उजनी धरणात येईल आणि तिथून पुन्हा चंद्रभागेत पाणी सोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
