आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार- देवेंद्र फडणवीस

| Updated on: May 07, 2022 | 1:41 PM

जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नाही आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार, असा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

Follow us on

काही वाटेल ते झाले आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) लढा लढला जाईल. जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नाही आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार, असा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. मुंबईत ते बोलत होते. भाजपा ओबीसी मोर्चातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय चिघळला असल्याचे ते म्हणाले.