Monsoon Updates | राज्यात यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस, हवामान तज्ज्ञांचा अंदाज
राज्यात यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

Monsoon Updates | राज्यात यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

| Updated on: Jun 01, 2021 | 12:55 PM

भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख अधिकारी ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रात यंदा पाऊस सरासरीच्या 99 टक्के होईल, असा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात खंड पडेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. विदर्भातील विविध भागात म्हणजे पश्चिम विदर्भात 98 टक्के, मध्य विदर्भात 102 टक्के, पूर्व विदर्भात 100 टक्के, मराठवाडा 98 टक्के, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात 98 टक्के, पश्चिम महाराष्ट्रात 99 टक्के मान्सन बरसेल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे.