मोठी बातमी! ‘पांढरी पट्टी’ वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर… काय घडलं?

मोठी बातमी! ‘पांढरी पट्टी’ वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर… काय घडलं?

| Updated on: Jun 13, 2026 | 12:33 PM

दादरमधील ‘शिवतीर्थ’ परिसरात आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेरील रस्त्यावर ही पांढरी पट्टी आखण्यात आली. यापूर्वी घाटकोपरमधील एका सोसायटीत अशाच प्रकारावरून मोठा वाद झाला होता

दादरमधील ‘शिवतीर्थ’ परिसरात आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेरील रस्त्यावर ही पांढरी पट्टी आखण्यात आली. यापूर्वी घाटकोपरमधील एका सोसायटीत अशाच प्रकारावरून मोठा वाद झाला होता. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला असून आता मनसे नेतेही आक्रमक झाले आहेत.

जैन समाजाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या साधूंना अनवाणी चालताना पायाला चटका कमी लागावा म्हणून ही पट्टी आखण्यात आली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशी व्यवस्था केली जाते, असा दावा जैन बांधवांनी केला. मात्र संदीप देशपांडे यांनी याला विरोध करत हा सार्वजनिक रस्ता असल्याचे सांगितले. दुपारी 3 वाजेपर्यंत पट्टी काढली नाही तर काळी पट्टी मारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

“पांढरी पट्टी हा सांस्कृतिक दहशतवाद आहे,” अशी टीका देशपांडे यांनी केली. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनीही जैन मंदिर परिसरातील आवाज आणि इतर त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Published on: Jun 13, 2026 12:33 PM
Follow Us