Special Report | नीरज गुंडे नेमके आहेत तरी कोण?
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एका व्यक्तीवरुन घेरलंय. या व्यक्तीचं नाव नीरज गुंडे असं आहे. हेच नीरज गुंडे हे फडणवीस मुख्यमंत्री असल्याच्या काळातले सचिन वाझे होते, असा दावा मलिकांनी केला आहे.
राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एका व्यक्तीवरुन घेरलंय. या व्यक्तीचं नाव नीरज गुंडे असं आहे. हेच नीरज गुंडे हे फडणवीस मुख्यमंत्री असल्याच्या काळातले सचिन वाझे होते, असा दावा मलिकांनी केला आहे. मलिकांनी आरोप केलेले नीरज गुंडे नेमके कोण आहेत याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! याशिवाय मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचा थेट ड्रग्ज प्रकरणाशी संबंध जोडलाय. समीर दाऊद वानखेडे जो गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. मोठ मोठे ड्रग्ज पॅडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, आमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
