एकनाथ शिंदेंनी… दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत

एकनाथ शिंदेंनी… दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत

| Updated on: Jun 24, 2026 | 4:14 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनांच्या संभाव्य युतीची चर्चा रंगली आहे. आमदार बच्चू कडू यांनी नुकतेच मोठं विधान करत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त केली. “

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनांच्या संभाव्य युतीची चर्चा रंगली आहे. आमदार बच्चू कडू यांनी नुकतेच मोठं विधान करत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त केली. “महाराष्ट्र धर्मासाठी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र आल्या तर राज्यासाठी चांगलं होईल,” असं मत त्यांनी मांडलं. मात्र हा त्यांचा वैयक्तिक विचार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध पक्षांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी बच्चू कडूंना थेट सवाल केला आहे. “असं विधान करण्यापूर्वी बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तसेच, “जर एकनाथ शिंदे यांना खरंच दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं वाटत असेल, तर आम्ही त्यासाठी पुढाकार घ्यायला तयार आहोत,” असंही नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या चर्चेला आणखी वेग आला आहे.

Published on: Jun 24, 2026 4:14 PM
Follow Us