BS Koshyari | हा महाराष्ट्र आहे, इथे मराठीतच बोललं पाहिजे; राज्यपाल कोश्यारींची आग्रही भूमिका

| Updated on: Nov 26, 2021 | 11:44 AM

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिहं कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळं चर्चेत असतात. राज्यपाल यावेळी एका चांगल्या बाबीसाठी चर्चेत आहेत. यवतमाळ (Yavatmal) येथील एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी भाषेंसंदर्भात ( Marathi Language) आग्रही भूमिका घेतल्याचं समोर आलं.

Follow us on

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिहं कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळं चर्चेत असतात. राज्यपाल यावेळी एका चांगल्या बाबीसाठी चर्चेत आहेत. यवतमाळ (Yavatmal) येथील एका कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी भाषेंसंदर्भात ( Marathi Language) आग्रही भूमिका घेतल्याचं समोर आलं. हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमात मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं, अशी भूमिका राज्यापालांनी घेतली. यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.