Yavatmal | माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
जिल्ह्यावर सध्या भीषण पाणीटंचाईचं संकट ओढवलं आहे. पैनगंगा नदीसह अनेक नद्यांची पात्रं पूर्णपणे कोरडी पडली असून परिसरात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळमधील गावांमध्ये पाण्याची तीव्र कमतरता जाणवत आहे.

यवतमाळमधील डोंगराळ भागाचं अडाण नदीचं पात्रही कोरडं पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावं लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे.
या संकटाचा फटका जनावरांनाही बसत असून पाण्याअभावी त्यांचीही हालअपेष्टा होत आहेत. एकेकाळी वर्षभर वाहणारी अडाण आता वाळूने भरलेली दिसत आहे. नदीच्या जलपात्रात आता फक्त वाळू उरली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
Published on: May 03, 2026 12:07 PM
Follow Us