ICC Men’s T20 World Cup | टी20 विश्वचषकात उलटफेर: झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले
१३ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवत मोठा उलटफेर केला. यामुळे झिम्बाब्वेने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. त्यांनी याआधी ओमानच्या संघाला पराभूत केले होते. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेचा हा दुसरा विजय ठरला आहे.
१३ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या के आर प्रेमदासा स्टेडियममध्ये टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवत मोठा उलटफेर केला. यामुळे झिम्बाब्वेने स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. त्यांनी याआधी ओमानच्या संघाला पराभूत केले होते. टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेचा हा दुसरा विजय ठरला आहे. मागील वेळ 2007 मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. तब्बल 19 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने 20 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर ब्रायन बेनेटने नाबाद 64 धावा, तादिवानाशे मारुमानीने 35 धावा, रायन बर्लने 35 धावा, आणि कर्णधार सिकंदर रझाने नाबाद 25 धावा केल्या. या संघाच्या कामगिरीमुळे झिम्बाब्वेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवता आला. झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी हरवलं आहे.
