राजीनाम्यानंतर अजित पवार नॉट-रिचेबल, घरासह फार्म हाऊसवरही शुकशुकाट

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या निवासस्थानासह फार्म हाऊसवर शुकशुकाट (Ajit pawar Missing) पाहायला मिळत आहे.

राजीनाम्यानंतर अजित पवार नॉट-रिचेबल, घरासह फार्म हाऊसवरही शुकशुकाट
Follow us
| Updated on: Sep 28, 2019 | 8:55 AM

रायगड : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar resigns) राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर अजित पवार यांचा मोबाईलही बंद (Ajit pawar Missing) आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या निवासस्थानासह फार्म हाऊसवर शुकशुकाट (Ajit pawar Missing) पाहायला मिळत आहे.

अजित पवार यांचा रायगडमधील कर्जत या ठिकाणी एक फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर ते नेहमी येत असतं. मात्र अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी शांतता पाहायला मिळत आहे. मात्र ते या ठिकाणी असल्याच्या चर्चाही रंगत आहेत.

राजीनामा देण्यापूर्वी अजित पवार हे त्यांच्या पुण्यातील भोसलेनगरमधील जिजाई बंगल्यात आल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र सध्या या ठिकाणीही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मध्यरात्री त्यांचा धाकटा मुलगा जय पवार हे ही या ठिकाणी आले होते. मात्र पहाटे 3.30 च्या सुमारास जय पवार हे सुद्धा बंगल्यातून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्याशिवाय अजित पवार यांचे बारामतीतील सहयोग सोसायटीमध्येही घर आहे. पण या ठिकाणच्या सोसायटीचे गेटही बंद केले आहे. सहयोग सोसायटीमध्ये पूर्वी खुला प्रवेश दिला जात असतं. मात्र सध्या या सोसायटीमध्ये जाण्यास प्रतिबंध केला जात आहे.

अजित पवारांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar resigns ) यांनी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा (Ajit Pawar resigns ) राजीनामा मंजूर केला. अजित पवारांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती हरिभाऊ बागडे यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.