अजित पवारांचा राजीनामा डिप्रेशनमधूनच, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

अजित पवारांनी वैफल्यग्रस्तेतून डिप्रेशनमधून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad comment on Ajit Pawar resign) केला.

अजित पवारांचा राजीनामा डिप्रेशनमधूनच, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

ठाणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar resigns) राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीसह सर्वच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिल्व्हर ओक यांच्या निवासस्थानी एका गुप्त बैठक (Jitendra Awhad comment on Ajit Pawar resign)  होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केली. अजित पवारांनी वैफल्यग्रस्तेतून डिप्रेशनमधून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad comment on Ajit Pawar resign) केला.

आपल्यामुळे सर्वांना त्रास होतो ही गोष्ट अजित दादांच्या मनाला लागली. खास करुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीच्या चौकशीसाठी जावं लागलं. याचा त्यांना त्रास झाला आणि त्या वैफल्यग्रस्तेतून डिप्रेशनमधून एका कुटुंबवत्सल अतिशय मृदू स्वभावाच्या अजित पवारांनी काल राजीनामा दिला, असे मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

“गेली 5 वर्ष सातत्याने भाजप सरकारने अजित पवारांना बदनाम केले. भाजपच्या मनात राग होताच. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर महाराष्ट्राच्या एक वर्ग हा अजित दादांना टार्गेट (Jitendra Awhad comment on Ajit Pawar resign) करत होता. त्यांचा मोकळा स्वभाव त्यांचा करडा आवाज हे महाराष्ट्राला दिसतं. पण त्यांचा कुटुंब वत्सल स्वभाग, भावना प्रधान, हृदयामध्ये अतिशय मृदू असलेला अजित पवार कोणालाही माहित नाही, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.”

“गेल्या अनेक वर्षात ते अनेकदा बोललं जितेंद्र खूप त्रास होतो रे, पण अस असलं तरी ते दाखवत नव्हते. पण त्यांना जे छळण्यात आलं त्याचा मनस्ताप झाला आणि ईडी हा त्यातील अंतिम आघात होता, असाही घणाघात आव्हाडांनी केला.”

“भाजपचं गणित हे फक्त व्यक्ती द्वेष आहे. अजित पवार हा एक मोठा नेता पुन्हा क्षितीजावर येईल हा पुन्हा त्रास देईल. माणूस चालू शकेल हे समजल्यावर त्याचे पाय कापा हे त्यांचं तंत्र आहे, अशी टीकाही जितेंद्र आव्हांनी भाजप(Jitendra Awhad comment on Ajit Pawar resign) सरकारवर केली.”

अजित दादांसारखा सुस्वभावी प्रेमळ, मृदू स्वभावचा माणूस राजकारणात सापडणे अवघड आहे. निर्णय प्रक्रियेत किंवा न्याय देताना ते लगेच खरं खोटं सांगतं. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचे मला कोणतेही आश्चर्य वाटलं नाही. काकांना त्रास झाला हे त्यांना सहनच होऊ शकतं नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

“मला काल दोन माणसांचे कौतुक वाटलं एक शिवसेनेचे आणि एक वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे. शरद पवारांचे आणि आंबेडकरांचे विचार फार वेगळे आहेत. पण तरीही त्यांनी पवारांची बाजू घेतली, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असेही म्हणत जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांसह शिवसेनेची पाठ थोपटली.”

शरद पवार जातील, अजित पवार भेटतील हे सगळं होईल. पण एक लक्षात ठेवा ते कुटुंब म्हणजे एक अभेद्य किल्ला आहे. त्यांच्यात गैरसमज झाला ही अफवा पसरवू नका. महाराष्ट्रातील कोणत्याही हौशा नवशा गौवशाने त्या कुटुंबावर बोलू नये. ते कुटुंब एक आहे. दो जिस्म मगर एक जान है हम हे त्यांना लागू होते. असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *