शिक्षणमंत्री फर्स्ट क्लासने पास, आशिष शेलार मोठ्या मताधिक्याने विजयी

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे.

शिक्षणमंत्री फर्स्ट क्लासने पास, आशिष शेलार मोठ्या मताधिक्याने विजयी

मुंबई : महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar BJP Bandra West) यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शेलार 25 हजार 900 पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले आहेत.

वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झालेली असतानाही आशिष शेलार यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. वांद्रे पश्चिम सारख्या बहुभाषिक मतदारसंघात कोणे एके काळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र 2014 मध्ये भाजपने खेचून आणलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेलार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

आशिष शेलार यांच्याविरोधात केवळ तीनच उमेदवार होते. काँग्रेसचे आसिफ जकेरिया शेलारांना कडवी झुंज देतील असं मानलं जात होतं. भाजपला डोकेदुखी ठरणाऱ्या चाळीस जागांमध्ये वांद्रे पश्चिम मतदारसंघाचा समावेश होता. याशिवाय बसप आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते.

आशिष शेलारांना शालेय मंत्रिपद

मंत्रिमंडळ फेरबदलात विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण मंत्रिपदाची धुरा काढून आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. निवडून आल्यावर फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात शेलार (Ashish Shelar BJP Bandra West) यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘शिवसेनेचे नेते, स्वतः अनिल परब माझ्या प्रचारासाठी आले. त्यानंतर सर्व शिवसैनिक पूर्णपणे कामाला लागले आहेत. त्यामुळे युतीत कुठलीही फट नाही’ असं आशिष शेलार म्हणाले होते. सेना-भाजपमध्ये वितुष्ट असल्याच्या चर्चांनंतर शेलार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *