भाजपनं गोड गोड बातमी म्हणून 'मॅटर्निटी हॉस्पिटल' केलंय : बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी (Balasaheb Thorat on Good News of BJP) भाजपच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यावर जोरदार कोपरखळी लगावली.

भाजपनं गोड गोड बातमी म्हणून 'मॅटर्निटी हॉस्पिटल' केलंय : बाळासाहेब थोरात

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी (Balasaheb Thorat on Good News of BJP) भाजपच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यावर जोरदार कोपरखळी लगावली. भाजप बऱ्याच काळापासून गोड बातमी देणार गोड बातमी देणार असं म्हणत आहे. मात्र, ती कधी येणार याची वाट पाहतो आहे. गोड बातमी देणार म्हणत भाजपनं मॅटर्निटी हॉस्पिटल सुरू केलं आहे का, असा प्रश्न करत बाळासाहेब थोरात यांनी (Balasaheb Thorat on Good News of BJP) भाजपला टोला लगावला.

राज्यातील सत्तास्थापनेतील पेच तयार होण्यासाठी भाजप सर्वस्वी जबाबदार आहे. भाजप मित्रपक्षाला दिलेला शब्द पाळत नसून यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरले जात आहे. या दोघांच्या भांडणात महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य जनतेला मात्र त्रास सहन करावा लागत आहे, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.

‘भाजपकडून पुन्हा आमदार फोडण्याचा प्रयत्न’

बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर आमदार फोडण्याचा गंभीर आरोप देखील केला. ते म्हणाले, “भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांशी संपर्क केला जात आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून आमदारांना फोडायचा प्रयत्न होतो आहे. निवडणुकीआधी देखील असे प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी झाले नाही. आता परत भाजप तोच प्रकार करत आहे.”

राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे. मात्र, ही धमकी नेमकी कोणाला दिली जात आहे, लक्षात येत असल्याचं थोरात यांनी नमूद केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *