भाजपकडून टिक टॉक स्टारला विधानसभेचं तिकीट

भाजपाने हरियाणामध्ये टिक टॉक स्टारला विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. सोनाली फोगाट असं या टिक टॉक स्टारचं (Tik tok star sonali fogat) नाव आहे.

Tik tok star sonali fogat, भाजपकडून टिक टॉक स्टारला विधानसभेचं तिकीट

चंदीगढ (हरयाणा) : भाजपाने हरियाणामध्ये टिक टॉक स्टारला विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. सोनाली फोगाट असं या टिक टॉक स्टारचं (Tik tok star sonali fogat) नाव आहे. सोनालीला भाजपने माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा आणि माजी खासदार कुलदीप बिश्नोईंच्या विरोधात आदमपूर मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरवले आहे. सोनालीचे टिक टॉकवर (Tik tok star sonali fogat) एक लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

राजकारणात येण्यापूर्वी सोनाली अभिनेत्री होती आणि काही सीरिअलमध्ये तिने काम केले आहे. टिक टॉकवर मोठ्या प्रमाणात तिचा चाहता वर्ग आहे. दररोज ती टिक टॉकवर अनेक नव-नवे व्हिडीओ बनवते. त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ होत आहे.

हिसार जिल्ह्यांत येणारा आदमपूर मतदारसंघ भजनलाल कुटुंबाचा गड आहे. भजनलाल कुटुंबाच्या एकाही सदस्याला या मतदारसंघातून कधी पराभवाचा सामना करावा लागला नाही. स्वत: कुलदीप बिश्नोई या मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. 2014 मध्ये कुलदीप बिश्नोई या मतदारसंघातून विजयी झाले. 1967 रोजी भजनलाल यांनी येथून पहिली निवडणूक लढवली होती.

दरम्यान, 2014 रोजी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरयाणात पूर्ण बहुमत मिळाले होते. तेव्हा भाजपने राज्यात 47 जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा राज्यात काँग्रेस फक्त 15 जागांवर विजय मिळवू शकली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *