भंडाऱ्यातील तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे गजाआड

तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम करताना भाजप आमदार चरण वाघमारे आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला पोलिस उपनिरीक्षकांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.

भंडाऱ्यातील तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे गजाआड
Follow us
| Updated on: Sep 29, 2019 | 10:49 AM

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे (BJP MLA Charan Waghmare) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या विनयभंग प्रकरणात भंडारा येथील निवासस्थानावरुन वाघमारेंना शनिवारी सकाळी अटक झाली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. न्यायालयाने वाघमारेंना 11 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

16 सप्टेंबरला तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांच्या सुरक्षा किट वाटपाचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. यावेळी आमदार चरण वाघमारे (BJP MLA Charan Waghmare) आणि भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला पोलिस उपनिरीक्षकांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी संबंधित महिला पोलिस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरुन विनयभंगासह कलम 353, 354, 472, 504, 506, 34 अंतर्गत 18 सप्टेंबर रोजी तुमसर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले होते.

चरण वाघमारे यांनी आपल्या समर्थकांसह पोलिस ठाण्यात धडक दिली होती. त्यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी पाच दिवसांचा अवधी मागून घेतला होता. शनिवारी सकाळी तपास अधिकारी आमदार वाघमारे यांच्या खात रोडवरील निवासस्थानी पोहचले.

बलात्काराचा पुरावा नष्ट करायला गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

वाघमारेंना ताब्यात घेऊन भंडारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. दुपारी तीनच्या सुमारास वाघमारेंना न्यायालयात हजर करण्यात आलं. समर्थकांनी जामिनासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार वाघमारे यांनी थांबवत जामीन घेण्यास नकार दिला. पोलिसांनी त्यांची रवानगी भंडारा कारागृहात केली.

विधानसभा निवडणुकांसाठी अद्याप तिकीटवाटप जाहीर झालेलं नाही. मात्र अशा परिस्थितीत वाघमारेंना तिकीट मिळणार, की त्यांचा पत्ता कट होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....