आचारसंहिता भंग प्रकरणी भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांविरुद्ध गुन्हा दाखल

तांड्यांवर प्रचार करत असतांना बबनराव लोणीकरांनी वादग्रस्त विधान केले होतं. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आचारसंहिता भंग प्रकरणी भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकरांविरुद्ध गुन्हा दाखल

जालना : भाजपच्या बबनराव लोणीकरांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (BJP Babanrao Lonikar). ‘तांड्यामध्ये कमळाच्या फुलाला लीड आहे, सगळ्या तांड्यात मी पैसे दिलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीत मला कसलीही भीती नाही’, असे विधान करणारे परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध सेवली पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Breach of code of conduct).

‘तांड्यामध्ये कमळाच्या फुलाला लीड आहे, सगळ्या तांड्यात मी पैसे दिलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीत मला कसलीही भीती नाही. आपण सगळे माझ्या सोबत आहात, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. आपण सगळ्यांनी रॅलीत यायचं आहे, मोदीजींच्या सभेला जायचं आहे’, असं विधान बबनराव लोणीकरांनी केलं होतं (Babanrao Lonikar). त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला.

मोहाडी तांडा येथील विजय पवार यांनी निवडणूक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी बबनराव लोणीकर यांना 24 तासाच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याबाबत नोटीस बजावली होती. विहीत मुदतीत लोणीकरांनी समाधानकारक स्पष्टीकरण सादर न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या आदेशावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 171 (इ) नुसार शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास लोणीकरांविरोधात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *