कुणी बोलायला लागलं की सरकार ईडीची पीडा मागे लावते : भुजबळ

बहुजन समाजातील जो नेता पुढे येतो, हे सरकार त्याचा पत्ता कट करतं, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर केला (Chhagan Bhujbal on ED). हे सरकार बहुजन समाजविरोधी असल्याचंही ते म्हणाले. तसेच, शरद पवारांवरील ईडी प्रकरणावरुनही भुजबळांनी सरकारवर निशाणा साधला

कुणी बोलायला लागलं की सरकार ईडीची पीडा मागे लावते : भुजबळ

नाशिक : बहुजन समाजातील जो नेता पुढे येतो, हे सरकार त्याचा पत्ता कट करतं, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर केला (Chhagan Bhujbal on ED). हे सरकार बहुजन समाजविरोधी असल्याचंही ते म्हणाले. तसेच, शरद पवारांवरील ईडी प्रकरणावरुनही भुजबळांनी सरकारवर निशाणा साधला (Chhgan Bhujbal Nashik).

नाशिकचे आघाडीचे उमेदवार बाळासाहेब सानप आणि सरोज अहिरे यांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत छगन भुजबळ यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील उपस्थित होते.

काहीही झालं की, सरकार ईडीची धमकी देतं. ईडीच्या चौकशीतून मी गेलो आहे. कोणी बोलायला लागलं, की ईडीची धमकी देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. शरद पवारही सरकार विरोधात बोलायला लागले, तेव्हा काही संबंध नसताना त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावली. त्यामुळे ही ईडीची पीडा आपल्याला कायमची गाडावी लागेल, असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच, हे आमचे 80 वर्षांचे जवान नेते आहेत, ते कुणाला भीत नाहीत, असं शरद पवारांकडे हातवारे करत छगन भुजबळ म्हणाले.

भाजप सरकार बहुजन समाज विरोधी

बहुजन समाजातील जो नेता पुढे येतो त्याचा पत्ता कट होतो. एकनाथ खडसे, चंद्रकांत बावनकूळे, विनोद तावडे आणि नाशिकचे बाळासाहेब सानप हे बहुजन समाजातील असल्यामुळेच यांचा पत्ता कट केल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. तसेच, हे सरकार बहुजनांच्या विरोधातील असल्याची टीका त्यांनी केली.

राफेलचं रक्षण लिंबू करणार

राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवल्याच्या मुद्यावरुनही भुजबळांनी सरकारला घेरलं. राफेल लढाऊ विमानाचं पूजन करताना चाकाखाली लिंबू ठेवला. आता राफेलचं रक्षण लिंबू करणार का? असा टोला भुजबळांनी सरकारला लगावला.

हे सरकार फसवं

तसेच, शिवसेनेची 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना बोगस असल्याचंही भुजबळांनी सांगितलं. हे सरकार फसवं आहे, असा आरोप त्यांनी राज्यातील युती सरकारवर केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *