अनेक वर्षांनी शिवसेना नेत्यांना भेटून कसं वाटलं, छगन भुजबळ म्हणतात...

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी (Chhagan Bhujbal on meeting Shivsena leaders) अखेर सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार केला आहे.

अनेक वर्षांनी शिवसेना नेत्यांना भेटून कसं वाटलं, छगन भुजबळ म्हणतात...

मुंबई: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी (Chhagan Bhujbal on meeting Shivsena leaders) अखेर सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार केला आहे. आता हा मसूदा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीतील नेत्यांनी आज याची माहिती माध्यमांना दिली. विशेष म्हणजे शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या छगन भुजबळ यांना पत्रकारांनी इतक्या वर्षांनी शिवसेना नेत्यांना भेटून कसं वाटलं (Chhagan Bhujbal on meeting Shivsena leaders) असाही प्रश्न विचारला.

पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळ म्हणाले, “शिवसेना नेत्यांची अनेक वर्षांनी भेट झाली. एकत्र बसून चर्चा केली. हा योग चांगला होता. शिवसेना नेत्यांना केवळ मीच भेटलो असं नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्वच नेते भेटले. आमच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही बैठक झाली. दोन दिवस ही बैठक सुरु होती. त्यात आम्ही शेतकरी, महिला, रोजगार, अल्पसंख्यांक, ओबीसी, एससी, एसटी अशा सर्वांसाठी एक कार्यक्रम बनवला आहे. त्यात अजून काही सुधारणा असतील तर आमचे पक्षप्रमुख ते सांगतील. त्याप्रमाणे त्यात काही बदल होऊ शकेन.”

आज राज्य अनेक अडचणींमध्ये सापडलं आहे. अशा स्थितीत सुकाणू कुणाच्याच ताब्यात नाही. तो राज्यपालांच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे पुढे काही पाऊलं पडून सत्तास्थापन होणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. एक महत्वाचं पाऊल पुढे पडलं आहे. आता पुढील निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील, असंही भुजबळ यांनी यावेळी नमूद केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, “किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार झाला आहे. हा मसूदा तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना पाठवला जाईन. ते यावर अंतिम निर्णय घेतील.” या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विजय वडेट्टीवार असे अनेक नेते उपस्थित होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *