चंद्रकांत पाटलांविरोधातील मनसे उमेदवाराला आघाडीचा पाठिंबा

कोथरुडमधून मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटलांविरोधात आपला स्वतंत्र उमेदवार देण्याऐवजी मनसे उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

चंद्रकांत पाटलांविरोधातील मनसे उमेदवाराला आघाडीचा पाठिंबा

पुणे : कोथरुडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विजयाची वाट खडतर होण्याची शक्यता आहे. कारण चंद्रकांत पाटलांविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मनसेसोबत हातमिळवणी (Congress NCP supports MNS against Chandrakant Patil) केली आहे. कोथरुडमधील मनसे उमेदवाराला आघाडीने पाठिंबा दिला आहे.

पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपचा गड असलेला कोथरुड मतदारसंघ चंद्रकांत पाटलांसाठी सेफ मानला जात होता.

कोथरुडमधून मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपला स्वतंत्र उमेदवार देण्याऐवजी मनसे उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी (Congress NCP supports MNS against Chandrakant Patil) वाढू शकतात.

महाआघाडीची कोथरुडसाठी ऑफर, चंद्रकांत पाटील प्रविण तरडेंच्या भेटीला

अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांना चंद्रकांत पाटलांविरोधात निवडणूक लढवण्यासाठी महाआघाडी आणि इतर काही पक्षांनी विचारणा केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी स्वतः प्रविण तरडेंच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तरडे यांनी आपण चंद्रकांत पाटलांच्या विरोधात लढण्याच्या सर्व ऑफरला नकार दिल्याचंही सांगितलं.

चंद्रकांत पाटील सध्या पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा लढवावी, अशी इच्छा भाजपाच्या नेत्यांची होती पण, कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी कोणताही मतदारसंघ सुरक्षित वाटत नव्हता. अखेर त्यांच्यासाठी कोथरुड मतदारसंघ निश्चित केल्याची माहिती आहे.

मेधा कुलकर्णी या सध्या भाजपच्या तिकीटावर कोथरुड मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळविला होता. यंदाच्या निवडणुकीत मेधा कुलकर्णींना तिकीट डावलण्यात आलं.

मेधा कुलकर्णी सुरुवातीला नाराज होत्या, मात्र चंद्रकांत पाटील यांच्या प्रचार मेळाव्यात उपस्थित राहून त्यांनी अखेर चंद्रकांत पाटलांना पाठिंबा दिला. माझी पक्षावर निष्ठा आहे. मला खंजीर खुपसला तरी चालेल. माझा प्राण घेतला तरी चालेल. भाजपचा विजय होणे महत्त्वाचे आहे, असं म्हणत त्या भावनिक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *