AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तास्थापनेस भाजपचा नकार, कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

भाजपने (BJP on Government Formation) देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यपालांना सत्तास्थापनेविषयीचा आपला निर्णय कळवला आहे.

सत्तास्थापनेस भाजपचा नकार, कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय
| Updated on: Nov 10, 2019 | 7:23 PM
Share

मुंबई: भाजपने (BJP on Government Formation) कोअर कमिटीच्या बैठकीनंतर राज्यपालांना सत्तास्थापनेविषयीचा आपला निर्णय कळवला आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. अखेर निकालानंतर 18 व्या दिवशी भाजपने सत्तास्थापनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेने महायुतीला जनादेश दिला होता. मात्र, शिवसेनासोबत येत नसल्यानं आपण सत्तास्थापन (BJP on Government Formation) करणार नाही, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या निर्णयाची माहिती दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “यावेळीच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत या महायुतीला जनतेने भरगोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो, जनादेश देखील महायुतीला दिला. मात्र, शिवसेना सोबत येत नसल्याने आम्ही राज्यपालांना सत्तास्थापनेस नकार दिला आहे. त्यामुळे राज्यपाल यापुढे काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.”

जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन करायचं असेल, तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा करणार का आणि त्यानंतर शिवसेना सत्तास्थापन करणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेनेकडून काय हालचाली होतात हेही पाहावं लागणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली होती. त्यानंतर भाजपने कोअर कमिटीची बैठक घेऊन सत्तास्थापनेच्या सर्व शक्यतांची चाचपणी केली. या बैठकीत भाजपमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळाले. यातील एक गट अल्पमतातील सरकार स्थापनेचा आग्रह करत होता, तर दुसरा गट असं अल्पमताचं सरकार स्थापन करणं धोक्याचं असल्याचं म्हणत विरोध करत होता. त्यामुळे ही बैठक बरिच लांबली. स्वत: अमित शाह यांनी देखील महाराष्ट्रातील नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आल्यास संख्याबळ कसे असेल?

शिवसेनेला आतापर्यंत 8 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 64 वर पोहचलं आहे.

राष्ट्रवादीचं संख्याबळ 54 आहे. शिवसेना + राष्ट्रवादी = 118 संख्याबळ होते.

जर काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला तर त्यामध्ये 44 आमदारांची भर पडेल, त्यामुळे संख्याबळ 162 वर पोहोचेल.

288 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 145 आमदारांची गरज असते.

संख्याबळ

शिवसेना (64) + राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) 64 + 54 + 44 = 162

महाआघाडीतील पक्ष – बहुजन विकास आघाडी (03), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02) = 6

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.