परळी, तुला पोटाची चिंता नाही काय? व्हायरल व्हिडीओतून पंकजा मुंडेंना चिमटे

अंबाजोगाई येथील रखडेला रस्ता, कारखान्यांचे वाजलेल्या तीन तेरा, कामगारांना वेळेवर मिळत नसलेले पगार, उड्डाण पुलांचा अभाव अशा अनेक समस्यांचा उल्लेख व्हायरल व्हिडीओमध्ये आहे.

परळी, तुला पोटाची चिंता नाही काय? व्हायरल व्हिडीओतून पंकजा मुंडेंना चिमटे

बीड : ‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?’ हे गाणं दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. याच धर्तीवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नावे महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना चिमटे काढणारा एक व्हिडीओ (Dhananjay Munde Viral Video) समोर आला आहे. ‘परळी, तुला पोटाची चिंता नाही काय?’ असा प्रश्न या गाण्यातून विचारण्यात आला आहे.

परळी मतदारसंघातील समस्यांचा पाढा या गाण्यातून वाचण्यात आला आहे. या समस्या सोडवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. उलट नुसतं भावनिक आवाहन करुन मतं मिळवली, असा दावा या गाण्यातून करण्यात आला आहे.

‘लय भारी’ या यूट्यूब अकाऊण्टवरुन हा व्हिडीओ (Dhananjay Munde Viral Video) शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांचा फोटो दिसत असला, तरी यामधील मतं त्यांची आहेत का, याविषयी माहिती नाही. शिवाय पंकजा मुंडे यांचा थेट उल्लेख गाण्यात नसला, तरी अप्रत्यक्षपणे त्यांना टोला लगावण्यात आला आहे.

अंबाजोगाई येथील रखडेला रस्ता, कारखान्यांचे वाजलेल्या तीन तेरा, कामगारांना वेळेवर मिळत नसलेले पगार, उड्डाण पुलांचा अभाव अशा अनेक समस्यांचा उल्लेख गाण्यामध्ये आहे.

काय आहे गाणं?

अंबाजोगाई रस्ता काही होईना.. होईना
मणके गेले कशी झाली दैना.. दैना
खड्ड्यांचा आकार कसा गोल गोल.. गोल गोल
मंत्री फक्त जनतेशी भावनिक बोल
परळी, तुला पोटाची चिंता नाही काय?

दोन वर्षांपूर्वी ‘सोनू’च्या गाण्याने सोशल मीडियावर धमाल उडवून दिली होती. अनेक जणांनी आपापल्या पद्धतीने हे गाणं गात व्हिडीओ शेअर केले होते. कोणी राजकीय चिमटे घेतले, तर कोणी सामाजिक समस्यांवर मतं मांडली होती. गेल्या वर्षी आरजे मलिष्काने मुंबईतील समस्यांवर बोट ठेवणाऱ्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत थेट सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली होती.

परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने धनंजय मुंडे (Dhananjay Munde Viral Video) यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांनाच पुन्हा भाजपकडून तिकीट मिळालं आहे. त्यामुळे परळीत पुन्हा एकदा भाऊ-बहिणीमध्ये रंगतदार सामना होणार आहे.

पंकजा आणि धनंजय या दोघांमध्ये नेहमीच वाक्-युद्ध रंगताना दिसतं. आता निवडणुकीच्या प्रचारात ते शिगेला पोहचताना दिसेल.

धनंजय मुंडे मानसिकदृष्ट्या आत्ताच हरलेत : पंकजा मुंडे

राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण, 2014 ला बीडमध्ये राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. केजमधून शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर नमिता मुंदडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि त्या भाजपच्या तिकीटावर रिंगणात उतरल्या.

दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे 2014 चा निकाल यावेळी कशा पद्धतीने बदलतो आणि कुणाचं पारडं जड राहतं याकडे लक्ष लागलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *