मतमोजणी केंद्राजववळ जॅमर बसवा, मोबाईल टॉवर बंद ठेवा : धनंजय मुंडे

मागील काही निवडणुकांपासून देशात ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड होत असल्याचा आरोप होत आहे, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

मतमोजणी केंद्राजववळ जॅमर बसवा, मोबाईल टॉवर बंद ठेवा : धनंजय मुंडे

बीड : विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांभोवती जॅमर बसवावा, तसंच मतदान ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde letter to EC) यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मागील काही निवडणुकांपासून देशात ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड होत असल्याचा आरोप होत आहे, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती आहे. निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता कायम रहावी, या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरुम आणि मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत, तसेच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत बंद करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे (Dhananjay Munde letter to EC) केली आहे.

धनंजय मुंडे बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात चुलत बहीण म्हणजेच भाजपच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे मैदानात आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *