माजी आमदाराचा शिवसेनेला रामराम, वंचितमधून अर्ज दाखल करण्याची शक्यता

सलग तीन वेळा आमदार राहिलेले शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना ऐनवेळी विधानसभेचे तिकीट (Ex MLA vijayraj shinde Left shivsena) नाकारण्यात आलं आहे. यामुळे नाराज शिंदे यांनी शिवसेनेला रामराम करत बंडाचे हत्यार उपसले आहे.

माजी आमदाराचा शिवसेनेला रामराम, वंचितमधून अर्ज दाखल करण्याची शक्यता

इबुलडाणा : सलग तीन वेळा आमदार राहिलेले शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांना ऐनवेळी विधानसभेचे तिकीट (Ex MLA vijayraj shinde Left shivsena) नाकारण्यात आलं आहे. यामुळे नाराज शिंदे यांनी शिवसेनेला रामराम करत बंडाचे हत्यार (Ex MLA vijayraj shinde Left shivsena) उपसले आहे. तसेच येत्या विधानसभेत ते अपक्ष किंवा वंचित आघाडीकडून उमेदवारी (Ex MLA vijayraj shinde Left shivsena) अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

शिंदे यांना तिकीट नाकारल्याने शिवसेना समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी शिंदेच्या समर्थकांनी तुम्ही फक्त अर्ज भरा असे सांगत निवडून आणायची जबाबदारी घेतली आहे. तसेच खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा उपप्रमुखाला त्याच्या बेडरुमध्ये तिकीट दिल्याचा आरोप बंडखोर शिंदे यांनी केला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेत माजी आमदार विजयराज शिंदे आणि खासदार प्रतापराव जाधव असे दोन गट आहेत. गेल्या 5 वर्षात शिंदे हे एकटे पडले होते. खासदार जाधव यांच्या गटाकडून त्यांना कोणत्याही कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात येत नव्हते. तसेच शिंदे यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी नव्हती. लोकसभेवेळीही शिंदे यांनी खासदार जाधव यांचा प्रचार न करता थेट अमरावती गाठत आनंदराव अडसूळ यांचा (Ex MLA vijayraj shinde Left shivsena) प्रचार केला.

विजयराज शिंदे हे अमरावती जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख होते. पण शेवटच्या टप्प्यात विधानसभेच्या तिकीटासाठी प्रयत्न करुनही शिवसेनेकडून खासदार गटाच्या उपजिल्हाप्रमुखाला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हटलं आहे. यावेळी नाराज शिंदे यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. जिल्हा उपप्रमुख संजय गायकवाड यांना जाधवांनी बेडरूममध्ये दिल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय गेली 35 वर्षे शिवसेनेची सेवा करून मोदींच्या नावावर निवडून आलो नसल्याचा टोलाही जाधव याना लगावला आहे.

गेल्या काही वर्षांत शिवसेनेचे वर्चस्व जिल्ह्यात नव्हे तर बुलडाणा मतदार संघ मध्ये बऱ्यापैकी वाढले आहे. पण तरीही अंतर्गत गटबाजी आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे कुठे ना कुठे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र तिकीट नाकारलं असता शिंदे समर्थकांनी घरी येऊन अपक्ष किंवा वंचित कडून निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. त्यावेळी आमदार शिंदे यांनी (Ex MLA vijayraj shinde Left shivsena) शुक्रवारी (4 ऑक्टोबर) निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदेंना शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे ते आता वंचितच्या वाटेवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ही जागा भाजपच्या वाटेला येईल या आशेवर बसलेले योगेंद्र गाडे यांच्या पदरही निराशा पडली आहे. कारण बुलडाणा विधानसभेची जागा शिवसेनेला मिळाले असून याचे तिकीट संजय गायकवाड यांना मिळाले. शिवसेनेच्या विजयराज शिंदेंना यावेळी तिकीट मिळण्याची खात्री होती, मात्र शिवसेनेतील गटबाजीचा थेट फटका त्यांना बसला.

भाजपाला बुलडाण्याची जागा न मिळाल्याने नाराज झालेले योगेंद्र गोडेंनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीच्या भानगडीत फक्त बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर अनेक ठिकाणही अनेक उमदेवार नाराज झाले आहेत. याचा फटका युतीला बसण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे वंचितची उमेदवारी न मिळाल्याने भारिपच्या नगराध्यक्ष पती मोहम्मद सज्जाद यांनी बंडखोरी करत एमआयएमची उमेदवारी मिळवली आहेत. सज्जाद हे शुक्रवारी (4 ऑक्टोबर) नामांकन दाखल करणार आहेत.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *