भाजपकडून रोहिणी खडसेंना उमेदवारी, शिवसेनेची बंडखोरी

मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांच्या मुलीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी (Jalgaon district shivsena chief Chandrakant Patil Vs Rohini Khadse) बंडखोरी केली आहे.

भाजपकडून रोहिणी खडसेंना उमेदवारी, शिवसेनेची बंडखोरी

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट करत मुक्ताईनगर त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना (Jalgaon district shivsena chief Chandrakant Patil Vs Rohini Khadse) उमेदवारी देण्यात आली आहे. मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांच्या मुलीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी (Jalgaon district shivsena chief Chandrakant Patil Vs Rohini Khadse) बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे रोहिणी खडसेंविरुद्ध रिंगणात उतरणार आहेत. यामुळे मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेला बंडखोरीचे ग्रहण लागलेले (Jalgaon district shivsena chief Chandrakant Patil Vs Rohini Khadse) दिसत आहे.

शुक्रवारी सकाळी जाहीर केलेल्या भाजपच्या चौथ्या यादीत खडसेंच्या जागी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी रोहिणी यांनी लगेचच उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या तिन्ही याद्यांमध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता या दिग्गजांच्या नावांचा समावेश नव्हता. एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या सून रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचंही बोललं जात होतं. खडसेंच्या उमेदवारी संदर्भात भाजपातील प्रमुख नेत्यांनीही बोलण्यासाठी नकार दिला होता.

मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ही जागा शिवसेनेसाठी मागितली होती. जर पक्षाने ही जागा दिली नाही, तर आपण अपक्ष लढणार असल्याचेही चंद्रकांत पाटील (Jalgaon district shivsena chief Chandrakant Patil Vs Rohini Khadse) म्हणाले होते.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत रोहिणी खडसेंविरोधात लढणार आहेत. चंद्रकांत पाटील हे गेल्या कित्येक वर्षांपासून खडसे याचे कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीची ऑफर दिली होती.

कोण आहेत चंद्रकांत पाटील?

  • चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे जळगाव जिल्ह्याचे प्रमुख आहेत.
  • चंद्रकांत पाटील हे गेल्या कित्येक वर्षांपासून खडसे याचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील खडसेंविरोधात लढले होते.
  • या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाटील यांना मदत केली होती. मात्र पाटील यांचा पराभव झाला होता.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *