आधीच पुतण्या, आता कट्टर समर्थकही विरोधात रिंगणात, जयदत्त क्षीरसागरांची डोकेदुखी वाढली

राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर यांचे एके काळचे कट्टर समर्थक शेख शफिक मोहम्मद यांना एमआयएमने बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

आधीच पुतण्या, आता कट्टर समर्थकही विरोधात रिंगणात, जयदत्त क्षीरसागरांची डोकेदुखी वाढली

बीड : बीड विधानसभा मतदारसंघात क्षीरसागर काका-पुतण्यांविरोधात होणारी लढाई रंगतदार होणार असतानाच आता जयदत्त क्षीरसागर यांचा एके काळचा कट्टर समर्थकही (Kshirsagar supporter to contest from MIM) रिंगणात उतरला आहे. शेख शफिक मोहम्मद यांना एमआयएमने उमेदवारी जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. एमआयएमने जाहीर केलेल्या पाचव्या यादीत बीड विधानसभा मतदारसंघातून शेख शफिक मोहम्मद यांचं नाव आहे.

शेख शफिक मोहम्मद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत सहभागी झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आहेत. शेख यांना आता एमआयएमने बीडमधून तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतण्या विरुद्ध काकांचा कट्टर समर्थक (Kshirsagar supporter to contest from MIM) अशी लढत आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी शिवबंधन हाती बांधलं होतं. त्यानंतर त्यांना रोहयो आणि फलोत्पादन खात्याचं मंत्रिपद मिळलं. उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना एबी फॉर्म देत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं. तर शरद पवारांनी बीडमधील सभेत संदीप क्षीरसागर यांना तिकीट दिलं होतं.

बीडमधील संभाव्य रंगतदार लढती

  • बीड – जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) VS संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
  • परळी – पंकजा मुंडे (भाजप) VS धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
  • गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) VS विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)
  • माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ) VS प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)

कपडे फाडून घेण्याची वेळ कोणावर येते बघूच, पुतण्याला जयदत्त क्षीरसागरांचं उत्तर

राजकारणात काका-पुतण्यातील वादाचा अंक अनेक वेळा पाहायला मिळाला आहे. बीडसाठी तर तो नवीन नाहीच. विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडण्याआधीच क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये चिखलफेक सुरु झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुका ऐन बहरात आल्यावर हा वाद कोणतं टोक गाठणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा म्हणजे बीड (Beed assembly seats) अशी ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण, 2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे 2014 चा निकाल यावेळी कशा पद्धतीने बदलतो आणि कुणाचं पारडं जड राहतं याकडे लक्ष लागलंय

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *