वरळी ते परळी LIVE : उमेदवारी अर्ज भरण्याची धामधूम

दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी फक्त एक क्लिकवर

वरळी ते परळी LIVE :  उमेदवारी अर्ज भरण्याची धामधूम
Picture

अतुल भोसले यांचा कराड दक्षिणमधून उमेदवारी अर्ज दाखल

कराड – भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचा कराड दक्षिणमधून उमेदवारी अर्ज दाखल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल

03/10/2019,12:02PM
Picture

पृथ्वीराज चव्हाणांचा अर्ज दाखल

कराड – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी राज्यपाल आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. आता लढत विचारांची आहे. भाजपा भावनिक मुद्दे काढत आहे मात्र आम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितले.

03/10/2019,11:58AM
Picture

पंकजा मुंडेंचं औक्षण

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राज्याच्या ग्राम विकास मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचे त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे, भगिनी खा.डॉ.प्रीतमताई गोपीनाथ मुंडे, यशश्री मुंडे यांनी औक्षण करून पेढा भरवला. या प्रसंगी समवेत पंकजा मुंडे यांचे पती डॉ.अमित पालवे, खा.डॉ.प्रीतम मुंडे यांचे पती गौरव खाडे, मंत्री महादेव जानकर असा पूर्ण परिवार होता.

03/10/2019,11:17AM

Picture

धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक

बीड: राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

03/10/2019,10:52AM
Picture

धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर

03/10/2019,10:57AM
Picture

बर्थडेचा मुहूर्त , आशिष शेलार अर्ज दाखल करणार

दर्शन, सोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा हे उपस्थित, जरीमरी माता मंदिर हे वांद्र्यातील पुरातन मंदिर आहे, आज आशिष शेलार यांचा वाढदिवस असल्याने दुग्धशर्करा योग त्यांच्यासाठी आला आहे

03/10/2019,10:38AM
Picture

श्रीनिवास पाटील यांचा उदयनराजेंविरोधात अर्ज

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे उमेदवार माजी खासदार श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार. सातारा येथे 11 वाजता श्रीनिवास पाटील अर्ज दाखल करतील. पाटलांचा अर्जाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसची उदयनराजे यांच्याविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी, श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचे औक्षण करण्यात आले.कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, आपण तिसऱ्यांदा खासदार होणार, श्रीनिवास पाटील यांना विश्वास

03/10/2019,9:49AM
Picture

नालासोपाऱ्यात भगवं-पिवळं वादळ

नालासोपारा : बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा आज भरणार उमेदवारी अर्ज. मोठ्या शक्ती प्रदर्शनासह दोघेही रॅली काढून उमेदवारी अर्ज भरणार. प्रदीप शर्मा सकाळी साडे दहा वाजता तर क्षितिज ठाकूर साडे बारा वाजता पायी रॅली काढत अर्ज भरणार. शर्मा यांची नालासोपारा पूर्व सेन्ट्रलपार्क येथून तर क्षितिज ठाकूर यांची नालासोपारा पूर्व उत्सव हॉटेल येथून रॅली निघणार. शर्मा आणि ठाकूर या दोघांच्याही शक्ती प्रदर्शनाकडे वसई विरार नालासोपारावासीयांची लक्ष

03/10/2019,9:44AM
Picture

चंद्रकांत पाटलांची रॅली

पुणे – कोथरूडचे ग्रामदैवत म्हातोबा मंदिरात दर्शन घेऊन चंद्रकांत पाटलांच्या रॅलीला सुरुवात होणार

03/10/2019,9:41AM
Picture

धनंजय मुंडे परळीतील वैद्यनाथाच्या दर्शनाला

03/10/2019,9:35AM
Picture

चंद्रपुरातून भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेते आज अर्ज दाखल करणार

चंद्रपूर : आज अनेक महत्वाचे उमेदवार अर्ज दाखल होणार, ब्रम्हपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार (काँग्रेस), पारोमिता गोस्वामी (आप) अर्ज दाखल करणार, तर वरोरा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) चंद्रपुरातून नाना शामकुळे (भाजप), चिमूर मतदारसंघातून धनराज मुंगले (भाजप बंडखोर), राजुरा वामनराव चटप (शेतकरी संघटना) हे सर्व मोठे नेते उमेदवारी अर्ज करणार

03/10/2019,8:37AM
Picture

काँग्रेस आघाडीकडून कुडाळ-मालवणसाठी काका कुडाळकर यांना उमेदवारी जाहीर

सिंधुदुर्ग : काँग्रेस आघाडीकडून कुडाळ-मालवणसाठी काका कुडाळकर यांना उमेदवारी जाहीर, शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्या विरोधात आघाडीचे उमेदवार काका कुडाळकर देणार लढत, माजी आमदार आणि काँग्रेसचे निष्ठावान पुष्पसेन सावंत यांना उमेदवारी नाकारली, काँग्रेसमध्येही आयारामांना उमेदवारी, काही महिन्यांपूर्वी काका कुडाळकरांचा भाजपमधून काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश, काका कुडाळकर उद्या कुडाळमधून उमेदवारी अर्ज दाखल

03/10/2019,8:32AM
Picture

नागपुरात अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार

नागपुरात आज अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल काँग्रेस बंडखोर प्रमोद मानमोडे, भाजपचे माजी आमदार समिर मेघे, काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे सकाळी दाखल करणार अर्ज, तर राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख दुपारी अर्ज दाखल करणार

03/10/2019,8:29AM
Picture

काँग्रेसकडून सिल्लोड मतदार संघातून प्रभाकर पलोदकर यांना उमेदवारी

औरंगाबाद : काँग्रेसकडून सिल्लोड मतदार संघातून प्रभाकर पलोदकर यांना तर औरंगाबाद पश्चिम मधून रमेश गायकवाड यांना उमेदवारी घोषित

03/10/2019,8:23AM
Picture

फॉर्म भरण्यासाठी एक दिवस असताना मावळ खेड या मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार नाही

पिंपरी – चिंचवड :  फॉर्म भरण्यासाठी एक दिवस असताना मावळ खेड या मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार नाही, एके काळी अजित पवार यांची एक हाती सत्ता असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब, पवारांचे काही शिलेदार भाजपात, तर काही शिलेदार राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्यास अनुत्सुक

03/10/2019,8:21AM
Picture

शिवसेनेचा बंडखोर उमेदवार वंचितच्या गळाला

बीड : शिवसेनेचा बंडखोर उमेदवार वंचितच्या गळाला, शिवराज बांगर यांना बीडमधून उमेदवारी, अशोक हिंगे यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द, जयदत्त क्षीरसागरांच्या उमेदवारीमुळे बांगर नाराज

03/10/2019,8:16AM
Picture

मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांचा शिवसेनेत प्रवेश

मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांचा शिवसेनेत प्रवेश, काल रात्री उशिरा संखे मातोश्रीवर, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश

03/10/2019,8:13AM
Picture

मनसेला जबर धक्का, आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत

03/10/2019,8:04AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *