अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा शिवसेनेला प्रस्ताव

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरुच आहेत.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा शिवसेनेला प्रस्ताव
Follow us
| Updated on: Nov 12, 2019 | 7:20 PM

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरी सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली सुरुच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी प्रस्ताव (NCP proposal to Shivsena for Government Formation) पाठवला आहे. यात त्यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्तावावर (NCP proposal to Shivsena for Government Formation) काय प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेस शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरुन पाठिंबा देण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसच्या बाहेरुन पाठिंब्याच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिकूल असल्याचं सांगितलं आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आग्रह धरला आहे. आता काँग्रेस अखेर काय निर्णय घेणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा राज्यात मध्यावधी निवडणुकांचीही नामुष्की येऊ शकते. असं झाल्यास या सर्वच पक्षांचे सत्तास्थापनेचं नियोजन बिघडणार आहे. त्यामुळेच या पक्षांचाही प्रयत्न लवकरात लवकर सत्तास्थापनेची बोलणी पूर्ण करण्याचा असणार आहे.

दरम्यान, या भेटीपूर्वी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने काही अटी शर्थी ठेवल्या आहेत. काँग्रेसने 11 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्षपद, किमान समान कार्यक्रम अशा प्रमुख अटी ठेवल्या आहेत.

काँग्रेसच्या 12 अटी

1) किमान समान कार्यक्रम

2) समन्वय समिती

3)  सत्तावाटपाचं सूत्र – 4 आमदारांमागे 1 मंत्रिपद म्हणजे 44 आमदारांनुसार 11 मंत्रिपदे

4) महापालिका निवडणुकांसाठी फॉर्म्युला तयार करणे

5) महामंडळांमध्येही काँग्रेसला वाटा हवा

6) शेतकरी हित आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र येत असल्याचं नमूद करणं

7) पाठिंब्याची पत्र उद्या देण्याची शक्यता

8) सोनिया गांधी यांची 15 काँग्रेस आमदारांना फोन करुन चर्चा

9) मल्लिकार्जुन खर्गे यांचा सेनेसोबतच्या युतीला विरोध, मात्र अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि शेवटी सुशीलकुमार शिंदे यांनी मनवल्यानंतर सोनिया गांधी युतीसाठी तयार

10) ठाकरे कुटुंबातील शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला काँग्रेसचा विरोध. जर मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबातील असेल तर रिमोट कंट्रोल त्यांच्याकडे असेल अशी काँग्रेसची धारणा

11) काँग्रेसला वाटतं, शिवसेना ड्रायव्हिंग सीटवर, राष्ट्रवादीकडे चावी आणि काँग्रेसकडे स्वतंत्र ब्रेक सिस्टिम असावी.

12) काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचं बाहेरुन पाठिंबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याचं मत

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.