मतदारांना एक क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती

मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र आणि मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची (Information about polling booth and voter list) सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदारांना एक क्लिकवर मिळणार मतदान केंद्राची माहिती

मुंबई : मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र आणि मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची (Information about polling booth and voter list) सुविधा निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात (Information about polling booth and voter list) आली आहे. या माहितीमध्ये  मतदान केंद्र, मतदार क्रमांक यांचा समावेश आहे.

अनेक मतदारांना आपले मतदार ओळख क्रमांक, मतदान केंद्राचे नाव, मतदार यादीतील क्रमांकाची माहिती नसते. मतदानादिवशी मतदार यादीतील क्रमांक शोधण्यात वेळ जातो. त्यामुळे मतदान स्लिप मिळण्यास विलंब होतो. ही अडचण दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांच्या (Assembly Election) सोयीसाठी ऑनलाईन मतदार माहिती मिळविण्याची सुविधा दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येईल. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या गोष्टींचा समावेश (Information about polling booth and voter list) करावा. मतदार ओळख क्रमांक आणि राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती (Assembly Election) मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

यामध्ये राज्य, विधानसभा मतदार संघाचे नाव, मतदाराचे संपूर्ण नाव, वडिलांचे/पतीचे नाव, लिंग, मतदार ओळख क्रमांक, मतदार यादीतील भाग क्रमांक, मतदाता क्रमांक, मतदाराचे भाग क्रमांक, मतदान केंद्राचा पत्ता इत्यादी माहिती छापलेली आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीचे औचित्य साधून त्यावर मतदानाची तारीखही छापण्यात (Information about polling booth and voter list) आली आहे. ही माहिती फक्त मतदारांच्या सोयीसाठी असून ती ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *