आमच्याकडे राम होता, भाजपमध्ये गेल्यावर तो रावण झाला : राज ठाकरे

आमच्याकडे होता तोपर्यंत राम होता, तुमच्याकडे गेल्यावर रावण झाला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आमदार राम कदम यांच्यावर (Raj Thackeray Ghatkoper) केली.

आमच्याकडे राम होता, भाजपमध्ये गेल्यावर तो रावण झाला : राज ठाकरे

मुंबई : “आमच्याकडे होता तोपर्यंत राम होता, भाजपमध्ये गेल्यावर रावण झाला” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आमदार राम कदम यांच्यावर (Raj Thackeray Ghatkoper) केली. घाटकोपरमध्ये आयोजित केलेल्या प्रचारसभेत त्यांनी राम कदम यांच्यावर टीकास्त्र (Raj Thackeray Ghatkoper) सोडलं. मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये गेलेल्या राम कदम यांना राज ठाकरेंनी टोला (Raj Thackeray Ghatkoper) लगावला.

तुमचा घाटकोपरचा आमदार सांगतो, तुम्हाला मुलगी पसंत पडली, तर मी उचलून घेऊन येईन. तुम्हाला मात्र त्याच काहीही वाटत नाही. त्यानंतर भाजपकडून त्यांना (राम कदम) तिकीटही दिलं जात. याचा अर्थ काय, तर आम्ही काहीही करु. अशी टीकाही राज ठाकरेंनी राम कदम यांच्यावर केली. मुलगी पळवून आणेन हे विधान केल्यानंतर त्यांना बक्षिस म्हणून पुन्हा तिकीट दिलं जात असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“महाराष्ट्रात निवडणुका सतत येतच राहतात. आपल्याला दुसरा धंदा काय, लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषद, ग्रामपंचायती अशा अनेक निवडणुका एकापाठोपाठ होतात. कोण आमदार, खासदार कसा निर्दयी पद्धतीने वागला. सरकार कसंही वागलं. त्यांनी कोणते निर्णय घेतले. जाहीरनाम्यात काय होतं. हे सामान्य जनता तपासत नाही,” असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरे यांनी परप्रातियांवरही निशाणा साधला. “सध्या शहरं बकाल होत आहे. स्थानिक भूमीपुत्र कसाबसा जगतो आहे. सगळ्या भागातून आमच्याकडे लोढें येतात. येथे आमच्या भूमीपुत्रांना आम्ही बघू शकत नाही आणि आता त्या लोढ्यांना पोसायचं. उत्तरप्रदेशातून दररोज 48 ट्रेन येतात. त्या रिकामी जातात. ही सर्व आलेली लोकं कुठे राहणार, काय करणार यांना कोणी विचारतं का?” असा प्रश्नही राज यांनी यावेळी उपस्थित केला.

“महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत हे सांगायचं काम कोणाचे सरकारचे. पण हे तुम्हाला सांगितलं जात नाही, कारण तुम्हाला गृहित धरलं आहे”, अशी टीकाही त्यांनी यावेळी सरकारवर केली. ही लोक पाच वर्षातून एकदा येतात. तुम्हीही आंधळेपणाने मत देता. आम्ही कोण आमदार, खासदार निवडतो याची आम्हाला कल्पना नाही, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“आमदार मुलगी पळवून आणू हे बोलल्यानंतर तुमच्या मनात जी काही आग झाली असेल, ती व्यक्त करण्यासाठी विरोधी पक्ष हवा. जर विरोधी पक्ष जगला नाही, तर बहुमताची सरकार तुम्हाला चिरडून टाकेल,” अशी टीकाही राज यांनी यावेळी केली.

“नोटबंदीच्या दहाव्या दिवशी मी बोललो होतो की सरकारच्या ह्या निर्णयामुळे उद्योगधंदे बंद पडत जाणार, देशावर बेकारीचं सावट येणार.. आणि तसंच घडलं. बीपीसीएल रिलायन्सला द्यायचा घाट सुरु आहे, आहेत त्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत, ही वेळ आणली कोणी?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *