8 कोटींचे सोने, 9 कोटींची दारु, आचारसंहिता कालावधीत 43 कोटींचा मुद्देमाल जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Code of conduct Violence) करण्यात आला आहे.

8 कोटींचे सोने, 9 कोटींची दारु, आचारसंहिता कालावधीत 43 कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Code of conduct Violence) करण्यात आला आहे. यात रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने- चांदी याचा समावेश (Code of conduct Violence) आहे. निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादनशुल्क विभाग यांनी ही कारवाई केली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी याबाबतची (Code of conduct Violence) माहिती दिली.

भरारी पथके (एफएस), स्थ‍िर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 9 कोटी 53 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात (Code of conduct Violence) आली आहे. तसेच या कारवाईत 9 कोटी 71 लाख रुपये किमतीची 11 लाख 88 हजार 400 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे निवडणूक यंत्रणा आणि अंमली पदार्थ विरोधी दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 15 कोटी 7 लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय 8 कोटी 77 लाख रुपयांचे सोने, चांदी, जवाहिर हे देखील जप्त करण्यात (Code of conduct Violence) आले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे (Maharashtra Assembly election 2019) निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

  • अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
  • नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
  • अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
  • मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
  • मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *