चौदा वेळा निवडणूक जिंकलो, ‘पद्मविभूषण’ मिळालं आणि शाह विचारतात तुम्ही काय केलं? : पवार

जर मी काहीच केलं नसतं, तर माझा पद्मविभूषणने सन्मान झाला असता का? असा प्रश्न शरद पवार यांनी अमित शाहांना विचारला.

चौदा वेळा निवडणूक जिंकलो, 'पद्मविभूषण' मिळालं आणि शाह विचारतात तुम्ही काय केलं? : पवार
Follow us
| Updated on: Oct 18, 2019 | 8:35 AM

नाशिक : सात वेळा विधानसभा आणि सात वेळा लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलो, चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री झालो, राष्ट्रपतींनी ‘पद्मविभूषण’ दिलं आणि अमित शाह विचारतात तुम्ही काय केलं? यांना पाच वर्षांपूर्वी कोण ओळखत होतं? अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह (Sharad Pawar on Amit Shah) यांच्यावर हल्लाबोल चढवला.

नाशिकमध्ये झालेल्या आघाडीच्या प्रचारसभेत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. अमित शाह यांना पाच वर्षांपूर्वी कोणी ओळखत तरी होतं का? गुजरातचे मुख्यमंत्री पंतप्रधान झाले, पाठोपाठ हे गृहमंत्री झाले. मी सात वेळा विधानसभेवर, सात वेळा लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलो. चार वेळा मुख्यमंत्री झालो. केंद्रीय गृहमंत्रिपद भूषवलं. कृषी खातं मागून घेतलं. काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतींनी बोलावून मला ‘पद्मविभूषण’ बहाल करणार असल्याचं सांगितलं. मला त्याचा प्रसार करायचा नाही, पण अमित शाह नावाची व्यक्ती राज्यात येऊन विचारते तुम्ही काय केलं? जर मी काहीच केलं नसतं, तर माझा इतका सन्मान झाला असता का? असा प्रश्न शरद पवार (Sharad Pawar on Amit Shah) यांनी विचारला.

आपल्या हवाई दलाने हल्ला केला आणि अमित शाह म्हणतात 56 इंचाच्या छातीमुळे हे घडलं. इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असताना त्यांनीही लष्कराला हवं ते करण्याची मुभा दिली होती. त्यांनी फक्त पाकिस्तानचा इतिहासच नाही, तर भूगोलही बदलला. पण लष्कराच्या शौर्याचं श्रेय त्यांनी कधी घेतलं नाही, असंही पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना सांगा आमच्या बापात दम आहे, दत्तक बापाची गरज नाही, नाशकात पवारांचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं, पण इथे कसलीच प्रगती नाही. मी लोकांना विचारलं तुमचा दत्तक बाप आहे कुठे? या मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची नाशिकला गरज नाही. आमच्या बापात दम आहे असं त्यांना सांगा, अशा शब्दात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. फडणवीस, बाड-बिस्तार बांधा 24 तारखेनंतर तुम्हाला नागपूरला परत जायचं आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

सध्या पैलवानच शिल्लक नाही या मुखमंत्र्यांच्या वक्तव्याला शरद पवारांनी उत्तर दिलं. समोरचा पैलवान तुम्हाला दिसत नाही पण 24 तारखेनंतर तुम्हाला तेल लावलेला पैलवान दिसेल. लक्षात ठेवा मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. तुम्हाला रेवड्यांवर कुस्ती खेळणारा पोरगाही सरळ करेल, असा टोला यावेळी पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.