सत्तासंघर्षात शरद पवार किंगमेकर ठरणार?

पावसातील सभेनंतर विधानसभा निवडणुकीत वादळ निर्माण करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच सत्तास्थापनेवेळीही किंगमेकर ठरणार असल्याचं चित्र आहे.

सत्तासंघर्षात शरद पवार किंगमेकर ठरणार?
Follow us
| Updated on: Nov 10, 2019 | 7:42 PM

मुंबई : सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेलं निमंत्रण भाजपने नाकारलं आहे. भाजपच्या कोअर कमिटीने राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपला निरोप कळवला. शिवसेनेची सोबत येण्याची इच्छा नसल्याचं सांगत भाजपने असमर्थता दर्शवली. आता शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करायचा झाल्यास त्यांच्यासमोरही संख्याबळाची जुळवाजुळव करण्याचं आव्हान असेल. सत्ताचक्राच्या केंद्रस्थानी असलेल्या शरद पवारांमुळे भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशा सर्वांचीच अडचण झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पावसातील सभेनंतर विधानसभा निवडणुकीत वादळ निर्माण करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच सत्तास्थापनेवेळीही किंगमेकर (Sharad Pawar Kingmaker) ठरणार असल्याचं चित्र आहे.

शरद पवारांनी आपण विरोधात बसणार असल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या दिल्ली भेटीने पवारांनी अनेक पर्यायांची चाचपणी सुरु ठेवल्याचं दिसलं होतं. शरद पवार-सोनिया गांधी यांची भेट झाली, शरद पवार-संजय राऊत यांच्या भेटीगाठींचा सिलसिला तर सुरुच आहे. त्यानंतर राष्ट्रवादी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचं पुढे आलं. मात्र सोनिया गांधींनी अद्याप आपला निर्णय दिलेला नाही. त्यामुळे पवार नेमकी काय भूमिका घेणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पवारांच्या भूमिकेने सर्वांचीच अडचण

पहिली अडचण भाजपची

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 54 जागा मिळाल्या आहेत. मात्र तिसऱ्या क्रमांकावर असूनही राष्ट्रवादी सत्तास्थापनेच्या आखाड्यात चर्चेत आहे. त्यामुळे 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची अडचण पवार ठरत आहेत. भाजपने सत्तास्थापनेला नकार देत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला तर शिवसेनेचं सरकार सत्तेत येईल.

शिवसेनेची अडचण

शिवसेना सुरुवातीपासूनच मुख्यमंत्रिपदावर दावा करत, भाजपशी दोन हात करत आहे. त्याशिवाय संजय राऊत यांनी आमच्याकडे पर्याय असल्याचं म्हणत 175 इतकं संख्याबळ असल्याचा दावा केला होता. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पर्याय दाखवत भाजपकडून महत्त्वाची खाती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आता भाजपने सत्तास्थापनेचा दावा करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करण्यास गेली, परंतु सेनेला राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला नाही (Sharad Pawar Kingmaker), तर शिवसेनेची मोठी अडचण होईल.

काँग्रेसची अडचण

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सेनेला थेट पाठिंबा देणं काँग्रेससाठी अडचणीचं आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दर्शवला तर अन्य राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो.

भाजपचा सत्तास्थापनेस नकार, शिवसेना समीकरण कसं जुळवणार?

जर काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा द्यायचं ठरवलं, म्हणजेच बहुमत चाचणीवेळी जर गैरहजर राहायचं ठरवलं, तरी मोठी अडचण होणार आहे. कारण काँग्रेसकडे 44 आमदारांचं संख्याबळ आहे. जर काँग्रेसचे आमदार बहुमतावेळी गैरहजर राहिले तर 288 वजा 44 म्हणजे 244 वर सदस्यसंख्या येईल. त्यामुळे बहुमताचा आकडा 145 वरुन 123 वर येईल.

शिवसेनेचे 56 + 8 अपक्ष + राष्ट्रवादीचे 54 यांचं संख्याबळ 118 पर्यंत पोहोचतं, तर भाजप आणि मित्रपक्षांची संख्या 116 पर्यंत जाते. अशावेळी मनसे, एमआयएम यांची भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळे काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बहुमत चाचणीवेळी गैरहजर राहणंही अडचणीचे आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा देणेही अडचण आणि गैरहजर राहून बाहेरुन पाठिंबा देणेही अडचणीचे आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.