राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

शरद पवार विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं संजय राऊत यांनी भेटीनंतर सांगितलं होतं

Sharad Pawar Press Conference, राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

मुंबई : राज्याच्या परिस्थितीबाबत बोलण्यासारखं काही नाही. आम्ही वाट पाहातोय, भाजप आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला आहे, त्यांनी लवकर सरकार स्थापन करावं. शिवसेना खासदार संजय राऊत हे कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. राष्ट्रवादी-काँग्रेस जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेण्यास तयार आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar press conference) घेऊन मांडली.

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात सर्वाधिक चर्चेत असलेल्या शरद पवार यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतल्यामुळे पवारांच्या भूमिकेला महत्त्व होतं.

शिवसेना-भाजपने लवकरात लवकर सरकार बनवावं. त्यांना सत्तास्थापनेची संधी मिळाली आहे. भाजप सेनेची 25 वर्षांची युती आहे, ती ते तोडतील असं वाटत नाही. संजय राऊत कुठलाही प्रस्ताव घेऊन आलेले नव्हते. आम्हाला विरोधात बसायची संधी दिली आहे, आम्ही ती नीट निभावू, अशी हमीसुद्धा पवारांनी दिली.

मी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहे. ती स्थिती पाहून केंद्राकडून मदत मिळवायचा प्रयत्न करेन. विमा कंपन्या त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडायला तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने या विमा कंपन्यांची बैठक घ्यावी, त्यांना सूचना द्याव्यात, असंही पवारांनी यावेळी सुचवलं.

अयोध्येचा निकाल लागल्यानंतर कुठल्याही घटकांनी हा निर्णय आपल्याविरोधात लागला, अशी भूमिका घेऊ नये. कुणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये, शांतता राखावी, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

दिल्ली पोलिसांना अत्यंत चुकीची वागणूक मिळाली. पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत, त्यांना 18 तास ड्युटी करावी लागते, अशा स्थितीत हा वर्ग नाखूश झाला तर ही गंभीर गोष्ट आहे, असंही पवार म्हणाले.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

Sharad Pawar Press Conference, राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

सेना-भाजप 25 वर्षांची युती तोडणार नाहीत

शिवसेना-भाजपने लवकरात लवकर सरकार बनवावं. त्यांना सत्तास्थापनेची संधी मिळाली आहे. भाजप सेनेची 25 वर्षांची युती आहे, ती ते तोडतील असं वाटत नाही. संजय राऊत कुठलाही प्रस्ताव घेऊन आलेले नव्हते. आम्हाला विरोधात बसायची संधी दिली आहे, आम्ही ती नीट निभावू

06/11/2019,12:50PM

Sharad Pawar Press Conference, राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

आम्ही जबाबदार विरोधी पक्ष

संजय राऊत कोणताही प्रस्ताव घेऊन आले नव्हते. राज्याच्या परिस्थितीबाबत बोलण्यासारखं काही नाही, आम्ही वाट पाहातोय, भाजप आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला आहे, त्यांनी लवकर सरकार स्थापन करावं, राष्ट्रवादी-काँग्रेसने जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भूमिका घ्यावी – शरद पवार

06/11/2019,12:43PM

Sharad Pawar Press Conference, राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा करणार

मी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करणार आहे. ती स्थिती पाहून केंद्राकडून मदत मिळवायचा प्रयत्न करेन. विमा कंपन्या त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडायला तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने या विमा कंपन्यांची बैठक घ्यावी, त्यांना सूचना द्याव्यात.

06/11/2019,12:42PM

Sharad Pawar Press Conference, राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

अयोध्या निकालानंतर शांतता राखा

अयोध्येचा निकाल लागल्यानंतर कुठल्याही घटकांनी हा निर्णय आपल्याविरोधात लागला, अशी भूमिका घेऊ नये. कुणीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये, शांतता राखण्याचं आवाहन मी करु इच्छितो

06/11/2019,12:40PM

Sharad Pawar Press Conference, राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

पीक विमा कंपन्यांना सूचना करा

अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, शेतकरी संकटात, केंद्राने मदत करावी, विमा कंपन्यांना सूचना करावी – पवार

06/11/2019,12:37PM
Sharad Pawar Press Conference, राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

पोलिस 18 तास ड्यूटीमुळे नाखुश

पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत, त्यांना 18 तास ड्युटी करावी लागते, अशा स्थितीत हा वर्ग नाखूश झाला तर ही गंभीर गोष्ट आहे

06/11/2019,12:36PM
Sharad Pawar Press Conference, राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

दिल्लीत पोलिसांना चुकीची वागणूक

दिल्लीत पोलिसांना चुकीची वागणूक मिळाली, गणवेशातल्या लोकांवर हल्ले होतात, त्याचा नैतिक परिणाम होतो – शरद पवार

06/11/2019,12:35PM
Sharad Pawar Press Conference, राऊतांकडून कोणताही प्रस्ताव नाही, पवारांचं स्पष्टीकरण, जबाबदार विरोधीपक्ष होण्याची हमी

शरद पवार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद लाईव्ह

06/11/2019,12:35PM

पत्रकार परिषदेआधी, संजय राऊत यांच्यासोबत पवारांची निवासस्थानी केवळ 9 मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर संजय राऊत निरोप घेऊन ‘मातोश्री’कडे रवाना झाले, तर शरद पवार पत्रकार परिषदेसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला आले. त्यामुळे महाराष्ट्राची दिशा ठरवणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.

संजय राऊत पुन्हा ‘सिल्व्हर ओक’वर, पवारांशी नऊ मिनिटांची भेट घेऊन ‘मातोश्री’कडे कूच

शरद पवार विरोधी पक्षात बसण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं संजय राऊत यांनी भेटीनंतर सांगितलं होतं. ‘शरद पवार साहेबांना भेटलो, नेहमीप्रमाणे ही सदिच्छा भेट होती. राज्यातील अस्थिर परिस्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त केली. जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधात बसण्याचा कौल दिल्यामुळे आपण विरोधी बाकावर बसणार असल्याचं पवारांनी सांगितलं’, असं संजय राऊत म्हणाले होते.

Sharad Pawar Press Conference

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *