राष्ट्रपती राजवटीत 105 किंकाळ्या आणि वेड्यांचा घोडेबाजार, सामनातून भाजपवर टीकास्त्र

शिवसेनेचे मुखपत्र सामनातून (Shivsena criticize BJP in Saamana) भाजपच्या आमचेच सरकार येणार या दाव्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.

राष्ट्रपती राजवटीत 105 किंकाळ्या आणि वेड्यांचा घोडेबाजार, सामनातून भाजपवर टीकास्त्र
Follow us
| Updated on: Nov 16, 2019 | 7:46 AM

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामनातून (Shivsena criticize BJP in Saamana) भाजपच्या आमचेच सरकार येणार या दाव्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. सरकार स्थापन करण्यास असमर्थता दाखवणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच आता आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसूबे उघड झाल्याचा आरोप सामनातून (Shivsena criticize BJP in Saamana) करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता वाढत असल्याचंच दिसत आहे.

महाराष्ट्राचे आपण मालक आणि देशाचे बाप आहोत असं कुणाला वाटत असेल, तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून बाहेर यावं. ही मानसिक अवस्था 105 वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. ही स्थिती जास्त काळ राहिली, तर मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु होईल. कालच्या राज्यकर्त्यास जनतेने वेडे किंवा मुर्ख ठरवावे हे आम्हाला बरे वाटत नाही, असं म्हणत सामनातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. तसेच भाजपचा सत्तेचा दावा करण्याचा प्रकार त्यांचं मानसिक संतुलन ठळल्याचं लक्षण असल्याचंही म्हटलं आहे.

सामनात म्हटलं आहे, “आता पुन्हा जे भाजपचेच सरकार येणार असा दावा करत आहे त्या 105 वाल्यांनी आधीच राज्यपालांना भेटून आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे सरकार स्थापनेस असमर्थ आहोत, असं कळवलं आहे. असं असताना राष्ट्रपती राजवट लागू होताच ते ‘आता सरकार फक्त आमचंच बरं का’ असं कोणत्या तोंडाने सांगत आहेत. जे बहुमत आधी त्यांच्याकडं नव्हतं, ते राष्ट्रपती राजवटीच्या वरवंट्याखालून कसं बाहेर पडणार असा प्रश्न आहे. लोकशाही आणि नैतिकतेचा खून करुन आकडा लावू शकतो ही भाषा महाराष्ट्राच्या पंरपरेला शोभणारी नाही. मग बोलणाऱ्या तोंडाची डबडी कोणत्याही पक्षाची असोत.”

राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे मनसुबे आता उघड झाले आहेत. स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करण्याचं वजन देणाऱ्याचा हा खोटारडेपणा आहे. हा खोटारडेपणा वारंवार उघड होत आहे, असाही आरोप सामनातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आला.

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.