PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना प्रतिक्षा 12 व्या हप्त्याची, ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केल्यावरच पैसे खात्यावर होणार जमा..!

'ई-केवायसी' प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आता. आता 31 जुलै ही तारिख ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वीच ही प्रक्रिया करणे महत्वाचे आहे.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांना प्रतिक्षा 12 व्या हप्त्याची, 'ही' प्रक्रिया पूर्ण केल्यावरच पैसे खात्यावर होणार जमा..!
पीएम किसानImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 6:06 AM

मुंबई : देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी (Central Government) केंद्र सरकारच्या (PM Kisan Scheme) पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाला आहे. आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत आहेत ते 12 व्या हप्त्याचे. सरकारने निर्धारित केलेल्या वेळेत हा हप्ताही शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा होणार आहे. पण त्यापूर्वी शेतकऱ्यांना (e-KYC) ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तरच 2 हजार रुपयांचा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. केंद्राने याबाबत सातत्याने जनजागृती केली असून मुदतही दोन वेळा वाढवून दिली आहे. आता शेतकऱ्यांना ही प्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार असून शेतकऱ्यांनी ई-केवायसी हे अपडेट किंवा नव्याने नाही केले तर शेतकऱ्यांना 12 हप्त्याला मुकावे लागणार आहे.

 दोन वेळेस मुदत वाढ

‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आता. आता 31 जुलै ही तारिख ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वीच ही प्रक्रिया करणे महत्वाचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. pm kisan.gov.in या केंद्राच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातूनही ई-केवायसी करता येणार आहे.

12 वा हप्ता केव्हा होणार जमा?

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा या योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये जमा केले जातात. यामध्ये 1 एप्रिल ते 31 जुलैच्या दरम्यान पहिला हप्ता, 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान दुसरा हप्ता तर तिसरा हप्ता हा 31 डिसेंबरपर्यंत जमा केला जातो. त्यानुसार आता बारावा हप्ता हा ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यापूर्वीच शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

असे करा ‘ई-केवायसी’

*आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. *आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.