प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मेळावा, एका कार्यक्रमात अनेक प्रश्न लागले मार्गी…

केवळ योजनांची योग्य माहिती नसल्याने शेतकरी लाभ घेण्याकडे कानडोळा करतात. याबाबत कृषी अधिकारी थेट ऑनलाईनचा पर्याय सांगून मोकळे होतात. पण नेमकी पध्दतच शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळेच सरकारचा उद्देशही साध्य होत नाही आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत नाही. हाच धागा पकडून आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मिरजगावात एक अनोखा मेळावा पार पडला आहे जो प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरला.

प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मेळावा, एका कार्यक्रमात अनेक प्रश्न लागले मार्गी...
संग्रहीत छायाचित्र

अहमदनगर : केवळ योजनांची योग्य माहिती नसल्याने शेतकरी लाभ घेण्याकडे कानडोळा करतात. याबाबत कृषी अधिकारी थेट ऑनलाईनचा पर्याय सांगून मोकळे होतात. पण नेमकी पध्दतच शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळेच सरकारचा उद्देशही साध्य होत नाही आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत नाही. हाच धागा पकडून आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मिरजगावात एक अनोखा मेळावा पार पडला आहे जो प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरला. कृषी योजनांचा लाभ मिळावा याकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज एकाच अर्जावर अनेक योजनांचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळतो. मात्र, लाभ घेताना अडचणी निर्माण होतात यामधीलच अडचणी मेळाव्यात सोडविण्यात आल्या आहेत

राज्यातील असा पहिलाच मेळावा

आतापर्यंत योजनांचा लाभ घेण्यासाठी अनंत अडचणींच सामना करावा लागतो. योग्य मार्गदर्शन दिले जात नाही. एवढेच नाही तर याबाबत कृषी विभागाला सर्वकाही माहिती असताना यामध्ये जनजागृती केली जात नाही. परंतू, शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची गुंतागुंत सोडवण्यासाठी हा अनोखा मेळावा घेण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांची तर माहिती झालीच आहे शिवाय लाभ कसा घ्यावयाचे याची माहितीही झाली आहे. या मेळाव्यात एका दिवसामध्ये 74 शेतकऱ्यांच्या समस्या दूर करून त्यांच्याकडून प्रात्याक्षिके घेण्यात आले.

अर्ज एक, योजना अनेक

शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा म्हणून ‘महाडीबीटी’ हे पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी हे पोर्टल महत्वाचे आहे. पण अनेक शेतकरी याचा वापर न करता थेट कार्यालयच जवळ करतात. पण योजनेच्या माहितीपासून ते लाभ कसा मिळवायचा याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना यावेळी करण्यात आले आहे. शिवाय असे उपक्रम भविष्यातही राबवले जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरलेल्या या मेळाव्यासाठी शेतकरी, कृषी अधिकारी, पशूसंवर्धन विभागातील कर्मचारी हे उपस्थित होते.

सर्वाच्या समन्वयामुळे प्रश्न मार्गी : आ. रोहित पवार

केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर या पोर्टलवरली माहिती भरण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनाही अडचणी येत आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ कोणी घेत नाही परिणामी योजनेचा निधी हा परत जात आहे. याची सखोल माहिती घेतल्यावर हे निदर्शनास आल्याने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तर याची माहिती झाली असून आता भविष्यातही असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे आ. रोहित पवार यांनी सांगितले आहे.

 संबंधित बातम्या :

अवकाळीच्या नुकसान खुणा : उरला-सुरलां कांदाही पाण्यात भिजला अन् दरात मार खाल्ला, 1 रुपयामध्ये 1 किलो कांदा

कामाचा माणूस : सात दिवसांपूर्वी गडकरींनी उल्लेख केला अन् इंधन म्हणून बांबू वापराला परवानगीही, पाशा पटेल यांच्या प्रयत्नांना यश

कृषिमंत्र्याचे ‘अल्टीमेटम’ आलं शेतकऱ्यांच्या कामी, अखेर रिलायन्स विमा कंपनीने घेतली नरमाईची भूमिका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI