Success Stroy : रासायनिक खताविना जांभळाची बाग, नांदेडच्या डॉक्टराने माळरानावर घेतले लाखोंचे उत्पन्न

शेती उत्पादन वाढीसाठी मोठा अट्टाहास करावा लागतो. जीवाचे रान करुनच पीक पदरात पडते अशा सर्व गोष्टींना डॉ. चव्हाण फाटा दिला आहे. त्यांनी माळरानावर तीन वर्षापूर्वी थाय जातीच्या सात हजार जांभळाच्या झाडांची लागवड केली होती. ही झाडे जोपासण्यासाठी वेगळे असे चव्हाण यांना करावेच लागले नाही. केवळ पाण्याची उपलब्धता एवढेच काय ते कष्ट.

Success Stroy : रासायनिक खताविना जांभळाची बाग, नांदेडच्या डॉक्टराने माळरानावर घेतले लाखोंचे उत्पन्न
नांदेड शहरालगतच्या माळरानावर बहरतेय जांभळाची बाग, लाखोंचे उत्पन्न अपेक्षित
Image Credit source: TV9 Marathi
राजीव गिरी

| Edited By: राजेंद्र खराडे

Jun 07, 2022 | 10:47 AM

नांदेड : पारंपरिक पध्दतीने शेती व्यवसात उत्पादन वाढणे आता शक्य नाही. काळाच्या ओघात (Crop Change) शेती पध्दतीमध्ये बदल हा करावाच लागणार आहे. हंगामानुसार पीक पध्दती आणि मिळेल त्या उत्पादनावर समाधान मानले तर शेती व्यवसायातून समृध्द होणे तसे अवघड आहे. पण माळरानावरही काय चमत्कार होऊ शकते हे (Nanded नांदेडच्या एका डॉक्टरांनी दाखवून दिले आहे. शहरालगतच्या माळरानावर डॉ. बी.डी. चव्हाण यांनी तीन वर्षापूर्वी (Purple cultivation) जांभळाची लागवड केली होती. यंदा या बागेतून त्यांना 20 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. शिवाय ही बाग जोपासण्यासाठी त्यांनी ना रासायनिक खताचा वापर केला ना कुण्या औषधाची फवारणी. केवळ उपलब्ध पाण्याच्या जोरावर त्यांनी ही किमया साधली आहे.

पाण्याची उपलब्धता हेच यशाचे गमक

शेती उत्पादन वाढीसाठी मोठा अट्टाहास करावा लागतो. जीवाचे रान करुनच पीक पदरात पडते अशा सर्व गोष्टींना डॉ. चव्हाण फाटा दिला आहे. त्यांनी माळरानावर तीन वर्षापूर्वी थाय जातीच्या सात हजार जांभळाच्या झाडांची लागवड केली होती. ही झाडे जोपासण्यासाठी वेगळे असे चव्हाण यांना करावेच लागले नाही. केवळ पाण्याची उपलब्धता एवढेच काय ते कष्ट. तीन वर्षानंतर यंदा जांभळाने झाडे लगडली आहेत. आठ एकरातील या बागेतून त्यांना 20 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. शिवाय आगामी 100 वर्ष या जांभळाचे उत्पादन त्यांना घेता येणार आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा प्रयोग काहीना काही उत्पन्न पदरी टाकतो हे विशेष.

ना खताची मात्रा ना औषधांची गरज

जांभळाची बाग जोपासण्यासाठी डॉ. चव्हाण यांना आवश्यकता होती ती केवळ पाण्याची. त्यांनी माळरानावरील 8 एकरामध्ये केवळ जांभळाची बाघ लावली आहे. शिवाय लागवडीपासून ना रासायनिक खताची मात्रा ना कोणते औषध केवळ पाण्याचे योग्य नियोजन हेच काय ते यशाचे गमक आहे. अगदी गावरानी पद्धतीने अत्यल्प खर्चात पुढच्या शंभर वर्षापर्यंत जांभळाचे उत्पादन मिळणार आहे. माळरानावर थोडीशी पाण्याची उपलब्धता असल्यास हा प्रयोग शेतकऱ्यांनी करायला हवा असे आवाहन डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी केले आहे.

20 लाखाचे उत्पन्न अपेक्षित

माळरानावरील जमिनीवर इतर कोणतेही पीक घेता येत नसल्याने डॉ. चव्हाण यांनी हा प्रयोग करण्याचे ठरविला होते. त्यानुसार तीन वर्षापूर्वी त्यांनी 8 एकरात 7 जांभळाच्या झाडाची लागवड केली.गावरान पध्दतीने जोपासणा आणि जोपासण्यासाठी ना कोणता खर्च यामुळे अधिकचा फायदा होणार आहे. योग्य निघराणीमुळे त्यांना या जांभूळ बागेतून 20 लाखाचे उत्पन्न अपक्षित आहे. त्यामुळे शेती करण्याची आवड असल्यास काय होऊ शकते हा डॉक्टरांनी दाखवून दिले आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें