AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola : मराठवाड्यानंतर विदर्भातही केळी बागा आडव्या, पहिल्याच पावसामध्ये बदलले चित्र

केळी हे बारमाहीचे पीक असले तरी बदलत्या वातावरणामुळे यंदा केळीचे दर घसरलेले आहेत. इतर फळांच्या उत्पादनाचा परिणाम केळीच्या दरावर झालेला आहे. अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा मोडल्या पण उर्वरीत क्षेत्रातील बागा आता वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत.

Akola : मराठवाड्यानंतर विदर्भातही केळी बागा आडव्या, पहिल्याच पावसामध्ये बदलले चित्र
वादळी वाऱ्यासह अकोला जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 11, 2022 | 11:04 AM
Share

अकोला :  (Kharif Season) खरीप हंगामातील पेरणीचा श्रीगणेशा कऱण्यासाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. उशीरा का होईना पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने मोठे नुकसान होत आहे. गतआठवड्यात मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात तोडणीला आलेल्या (Banana garden) केळी बागा आडव्या झाल्या होत्या तर आता अकोला जिल्ह्यात केळी बागाचे नुकसान झाले आहे. (Akola) जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये जवळपास 100 ते 150 हेक्टरावरील केळी आडवी झाली आहे. आता काढणी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच झालेले नुकसान न भरुन निघण्यासारखे आहे. पहिल्या पावसाने जिल्ह्यातील चित्र बदलले असले तरी केळी उत्पादकांना नुकसानीच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत.

घटत्या दराची चिंता त्यामध्येच न भरुन निघणारे नुकसान

केळी हे बारमाहीचे पीक असले तरी बदलत्या वातावरणामुळे यंदा केळीचे दर घसरलेले आहेत. इतर फळांच्या उत्पादनाचा परिणाम केळीच्या दरावर झालेला आहे. अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागा मोडल्या पण उर्वरीत क्षेत्रातील बागा आता वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. शिवाय केळी तोडणी तोंडावर असतानाच निसर्गाची अवकृपा झाली आणि एका रात्रीतून होत्याचे नव्हते झाले आहे.

नुकसानभरपाईची मागणी

केळी बागांना हंगामाच्या सुरवातीपासूनच फटका बसलेला आहे. यापूर्वी अवकाळी पावसामुळे रोगराईचा प्रादुर्भावामुळे उत्पादनाच घट झाली होती तर काढणीच्या दरम्यान दर घटले. दुसरे हे फळपिक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी हजारो खर्च केला होता. त्यामुळे आता कुठे अपेक्षित उत्पन्न पदरी पडेल अशी आशा असतानाच शुक्रवारी वादळी वाऱ्यामुळे तेल्हारा, अकोट तालुक्यातील बागा ह्या आडव्या झाल्या आहेत. केळीसकट बागा जमिनदोस्त झाल्याने आता प्रशासनानेच पंचनामे करुन मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.दानापुरात तर 100 हेक्टरावरील केळीबागा आडव्या झाल्या आहेत.

पावसामुळे खरिपाचा मार्ग सुखकर

पाऊस हा अवकाळी असो की हंगामातला नुकसान मात्र, फळपिकांचे हे ठरलेलेच आहे. यापूर्वी अवकाळी पावसामुळे आंबा, द्राक्ष या फळपिकांचे नुकसान झाले होते तर आता केळी बागा आडव्या झाल्या आहेत. त्यामुळे फळबागांमधून अधिकचे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. मात्र, पावसाच्या आगमनामुळे खरिपातील रखडलेल्या पेरणी कामांना वेग येणार आहे. खरीपपूर्व मशागतीची कामे तर झाली आहेत अपेक्षित पाऊस झाला की चाढ्यावर मूठ धरायला शेतकरी मोकळा होणार आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी