बीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न

कृषी पदवीधारक असलेल्या एका तरुणाने नोकरीकडे पाठ फिरवून केवळ अडीच महिन्यात फक्त एका एकरात सात लाखांचं उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे. (Beed Farmer get 7 lakh profit)

बीडची ढोबळी मिरची हैदराबादच्या बाजारात, कृषी पदवीधारक तरुणाने तीन महिन्यात घेतलं 7 लाखांचं उत्पन्न
Beed Farmer Cultivation feature (1)

बीड : मेहनत, जिद्द आणि चिकटीच्या जोरावर काहीही अशक्य नाही हे एका तरुण शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. कृषी पदवीधारक असलेल्या एका तरुणाने नोकरीकडे पाठ फिरवून केवळ अडीच महिन्यात फक्त एका एकरात सात लाखांचं उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे. गजानन इंगळे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सध्या त्याची केज तालुक्यातील साळेगाव येथील पंचक्रोशीत मोठी चर्चा आहे. (Beed Farmer Cultivation of chillies get 7 lakh profit in three month)

गजानन यांनी कृषी पदवी मिळवल्यानंतर त्यांनी नोकरीचे प्रयत्न सुरू केले. पण तोपर्यंत काय करायचे? व्यवसाय करायचा झाला तर भांडवल कसे उभे करायचे? कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला तर तो चालेल की नाही? मग पुन्हा काय? असे अनेक प्रश्न त्यांना पडले होते. मात्र यानंतर त्या कृषी पदवीधर तरुणाने ऐन उन्हाळ्यात ढोबळी मिरची लागवडीचा एक साहसी आणि धाडसी निर्णय घेतला.

अशी केली लागवड?

आपल्या वडिलोपार्जित शेतीत पारंपरिक पीक न घेता आपल्या कृषी पदवीच्या ज्ञानाचा उपयोग करत ढोबळी मिरचीचे पीक घेतले. त्यासाठी त्याने जमीन तयार केली. त्याला शेणखत, कंपोस्ट खत आणि इतर खतांचा बेसल डोस देऊन जमीन तयार केली. त्यावर पाच फूट अंतरावर बेड तयार करून ठिबक सिंचन आणि मल्चिंग केले. त्यात 6 फेब्रुवारीला 5×1 अंतरावर मिरचीची लागवड केली. त्यासाठी त्याला 13 हजार रोपे लागली. त्याला ड्रीप द्वारे खत आणि औषध फवारणी केली. त्यानंतर लागवडी पासून 50 व्या दिवसांपासून मिरची बहरात आली आहे. आता पर्यंत 4 वेळा तोडणी केली आहे. आतापर्यंत सुमारे 12.5 टन एवढे उत्पन्न निघाले आहे.

तीन महिन्यात 6.30 ते 7 लाख रुपयाचे उत्पन्न

सध्या ही मिरची कळंबच्या व्यापाऱ्यामार्फत हैद्राबाद येथे विक्रीसाठी जात आहे. सध्या या मिरचीला सुमारे 20 ते 22 हजार रु. टन भाव आहे. आतापर्यंत चार वेळा झालेल्या मिरचीच्या तोडणीतून त्याला 2 लाख 60 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. यापुढे सुमारे 35 ते 40 टनाच्या आसपास मिरचीचे उत्पन्न निघण्याची शक्यता आहे. यातून सुमारे साडेसहा ते सात लाखाच्या आसपास उत्पन्न होण्याची खात्री आहे.

यामुळे एक एकर शेतीत गजानन इंगळे यांनी अवघ्या तीन महिन्यात सुमारे 6.30 ते 7 लाख रुपयाचे उत्पन्न घेऊन या तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

ढोबळी मिरची लागवडीचा खर्च 

१) रोपे – 15000 रुपये
२) मल्चिंग – 15000 रुपये
३) बेसल डोस – 10000 रुपये
४) फवारणी व अंतर मशागत – 50000 रुपये
५) मजुरी – 30000 रुपये
६) पेरणीपूर्व मशागत व इतर – 30000 रुपये

एकूण खर्च :- 1 लाख 50 हजार रुपये

(Beed Farmer Cultivation of chillies get 7 lakh profit in three month)

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊन वाढल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, शेकडो क्विंटल टरबूज शेतातच सडण्याची वेळ

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 600 मीटर अंतरावरील कृषी पंपांना जोडणीला प्राधान्य देणार, नितीन राऊत यांची घोषणा

संपूर्ण आयुष्य पर्यावरणासाठी समर्पित केलं, एक कोटी झाडांकडून ऑक्सिजन मिळवून देणारा देवमाणूस, अख्ख्या जगाचा सलाम !