ना पशुपक्ष्यांकडून नुकसान, ना रोगाची भीती, ‘या’ पिकाची लागवड करुन व्हा मालामाल

कोरोना काळात आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अनेक औषधी गुणधर्मांसह समृद्ध असलेल्या अन्नाची मागणी वेगाने वाढत आहे. (Chia seed farming earn bumper incomes know all details)

ना पशुपक्ष्यांकडून नुकसान, ना रोगाची भीती, 'या' पिकाची लागवड करुन व्हा मालामाल
Chia seed farming
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 1:05 PM

मुंबई : बदलत्या काळात शेतकरीही बदलत आहेत. आता ते पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांकडे वळत आहेत. या पिकांची लागवड केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि भरभराट पाहायला मिळत आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांसह अधिक फायदा देणारी पिके घेण्यास सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. (Chia seed farming earn bumper incomes know all details)

कोरोना काळात आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अनेक औषधी गुणधर्मांसह समृद्ध असलेल्या अन्नाची मागणी वेगाने वाढत आहे. यामुळे पौष्टिक आणि चव यांचे मिश्रण असलेले पीक बाजारात घेतले जात आहे. याच कारणामुळे गेल्या काही वर्षात चिया बियाणं लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

मेहनत कमी आणि मिळकत खूप जास्त

चिया बियाणे हे साधारण सब्जाप्रमाणे असतात. चिया बियाणे भारतात मिळत नाही. ते मेक्सिकोमधून आयात करावे लागेल. हे भारतात अस्तित्वात नाही. चिया बियाण्यांची किंमत खूप कमी असते. या बियाण्याच्या लागवडीदरम्यान वनस्पतीतून एक विशिष्ट प्रकारचा गंध येतो. तसेच त्याच्या पानांवर केसांप्रमाणे एक विशिष्ट गोष्ट असते.

यामुळे अनेक पशूपक्षी त्याच्या जवळ येत नाही. तसेच याला सिंचनाची विशेष गरज भासत नाही. याच्या लागवडीनंतर मेहनत कमी आणि मिळकत खूप जास्त असते. चिया बियाणे लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते, ते सहज एक एकर जमिनीवर 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतात.

चिया बियाण्यांचे वैशिष्टयं काय?

चिया बियाणे हे चव आणि पौष्टिक मूल्यांनी परिपूर्ण असते. या बियाण्यांमध्ये 30 ते 35 टक्के उच्च प्रतीचे तेल आढळते. हे ओमेगा -3, ओमेगा -6 आणि फॅटी अॅसिडचा उत्कृष्ट स्रोत मानला आहे. हे तेल सामान्य आरोग्यासाठी आणि हृदयासाठी खूप चांगले मानले जाते.

चिया बियाण्यांमध्ये प्रथिने, खाद्य फायबर, अँटी-ऑक्सिडेंट्स, खनिज ग्लायकोकॉलेट आणि मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे आढळतात. चिया बियाण्यामध्ये दुधापेक्षा 6 पट जास्त कॅल्शियम आढळते. चिया बियाण्यांमध्ये वजनाच्या 12 पट तुलनेत पाण्याचे प्रमाण शोषण्याची क्षमता असते. या कारणास्तव ते अन्न उद्योगासाठी अधिक उपयुक्त मानले जाते. चियाच्या बिया या सॅलड म्हणूनही वापरल्या जातात. तसेच दूध आणि ताकाबरोबर त्याचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जाते. त्याच्या हिरव्या पानांपासून बनवलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. हे बियाणे भूक शांत करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात.

औषध कंपन्या कंत्राटी शेती

तज्ज्ञांच्या मते, चिया बियाण्यामुळे शरीरात 18 टक्के कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. या बिया पाचक प्रणाली सुधारण्यासाठी आणि शुगर असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त मानले जातात. या पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन आणि लाभ घेण्यासाठी शास्त्रीय शेती सेंद्रिय पद्धतीने करावी.

अनेकदा विविध डॉक्टरही  चिया बियाणे खाण्याचा सल्ला देतात. तसेच काही औषधी कंपन्याही करारावर चिया बियाण्यांच्या लागवड करत आहे. तसेच चिया बियाण्यांच्या लागवडीसाठी तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर देखील करु शकता. (Chia seed farming earn bumper incomes know all details)

संबंधित बातम्या : 

शिवगामी तांदूळ, कटप्पा तांदूळ, बाहुबलीतील व्यक्तिरेखांची बियाण्यांना नावं, खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी

सरकारकडून शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत, 10 दिवसांत नोंदणी करुन लाभ मिळवा

शेतकऱ्यांना मालामाल बनवेल ‘ही’ औषधी वनस्पती, एका एकरात 4 लाख रुपयांपर्यंत कमाईची संधी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.