सांगोलकरांचे डाळिंब आता दोन कोटींच्या शीतगृहात, राज्यातील दुसरं मोठं शीतगृह सांगोल्यात

नाशवंत मालासाठी शीतगृह उभारण्याची मागणी गेल्या 10 वर्षापासून होती. या मागणीला आता मूर्त स्वरुप मिळाले असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सांगोला येथे तब्बल दोन कोटी रुपयांचे आणि 840 मेट्रिक टन क्षमतेचे शीतगृह उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हे उपलब्ध करण्यात आले असून आता डाळिंबाचे होणारे नुकसान हे टळणार आहे.

सांगोलकरांचे डाळिंब आता दोन कोटींच्या शीतगृहात, राज्यातील दुसरं मोठं शीतगृह सांगोल्यात
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 6:44 PM

सोलापूर : (Sangola) सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात (pomegranate) डाळिंबाचे उत्पादन हे घेतले जाते. नाशवंत मालासाठी शीतगृह उभारण्याची मागणी गेल्या 10 वर्षापासून होती. या मागणीला आता मूर्त स्वरुप मिळाले असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सांगोला येथे तब्बल दोन कोटी रुपयांचे आणि 840 मेट्रिक टन क्षमतेचे शीतगृह उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हे उपलब्ध करण्यात आले असून आता डाळिंबाचे होणारे नुकसान हे टळणार आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र शासनाने 75 टक्के तर वखार महामंडाळाने 25 टक्के असा 2 कोटींचा निधी प्राप्त झाला होता. यामधून या शीतगृहाची उभारणी करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यात डाळिंब उत्पादक आहेत मात्र, त्यांच्या मालाच्या साठवणुकासाठी योग्य साधन असे नव्हते. त्यामुळे सन 2010 साली वखार महामंडळाने येथील शेतकऱ्यांसाठी शीतगृह देण्याचे मान्य केले होते.

मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सांगोलाकरांची ही मागणी प्रलंबित होती. अखेर शीतगृह तर उभारण्यात आले आहे शिवाय, 1800 मेट्रिक टन क्षमतेचे गोडावून उभारण्यासाठी येथील कृषी उत्पन्न समितीने 20 गुंठे जागा ही 30 भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे डाळिंब साठवणुकीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे. डाळिंबाबरोबरच इतर शेती माल ठेवण्यासाठी या वखाराचा उपयोग शेतकऱ्यांना होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

राज्यातील दुसरे मोठे शीतगृह

उत्पादनाबरोबरच शेती मालाची साठवणूकही महत्वाचा मुद्दा आहे. सांगोला सारख्या दुर्गम भागात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरीन हे डाळिंबाचे उत्पादन घेतात. मात्र, नाशवंत माल ठेवण्यास योग्य जागा नसल्याने त्यांचे उत्पादन हे घटत होते. आता राज्यातील दुसरे तर पुणे विभागातील पहिले शीतगृह उभारण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

नव्याने उभारण्यात आलेल्या शीतगृहाची वैशिष्टे

840 मेट्रीक टनाचे हे शीतगृह असून यामध्ये तीन वेगवेगळे भाग आहेत. याचे तापमान हे 0 अंश ते 4 डीग्री सेल्सिअस असणार आहे. ज्यामुळे नाशवंत माल हा टिकून राहणार आहे. 24 तास विजपुरवठा, जनरेटर, किटक नियंत्रित तसेच 24 तास सुरक्षा व्यवस्थेत हे शीतगृह राहणार आहे.

आता निर्यातीचाही मार्ग मोकळा

अत्याधुनिक साधनांची सोय नसल्याने उत्पादित झालेला माल निर्यात करणेही अवघड होते. त्यामुळे डाळिंब उत्पादकाना आर्थिक फटकाही सहन करावा लागत होता. आता शीतगृहाची सोय झाल्याने शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मिटणार आहेत. (construction-of-cold-storage-in-sangola-relief-to-pomegranate-growers)

संबंधित बातम्या :

तेलबियाणांच्या उत्पादनात होणार घट, कृषी मंत्रालयाचा अंदाज

निसर्गाचा अभ्यास करुन शेतकऱ्यांच्या फायद्याची शेती ही काळाची गरज : कृषीमंत्री

काय सांगता ? यंदाच्या पावसाळ्यात लेंडी नदीच्या पूरामुळे 10 गावांचा 48 वेळा संपर्क तुटला

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.