तुम्हाला माहिती आहे का झाडे अचानक का सुकतात? हवामान बदलाचा परिणाम की अणखीन काही…!

आतापर्यंत हवामान बदलाचा परिणाम पिकांवर झालेला होता. किंबहुणा सध्याही खरिपासह रब्बीतील पिकांवर आणि फळबागांवर होत आहे. पण आता विदर्भातील कडूलिंबाच्या झाडावरही या हवामान बदलाचा परिणाम जाणवत आहे. याबाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केलीय. कारण 'टि मॅास्किटो बग' या किटकाला सध्याचे वातावरण पोषक असल्यानेच हा बदल होत आहे.

तुम्हाला माहिती आहे का झाडे अचानक का सुकतात? हवामान बदलाचा परिणाम की अणखीन काही...!
संग्रहीत छायाचित्र

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शेती व्यवसयात आणि व्यवसयाशी निगडीत बाबांमध्ये एक वेगळाच बदल होत आहे. आतापर्यंत (Changes in environment) हवामान बदलाचा परिणाम पिकांवर झालेला होता. किंबहुणा सध्याही खरिपासह रब्बीतील पिकांवर आणि फळबागांवर होत आहे. पण आता विदर्भातील (impact on trees too) कडूलिंबाच्या झाडावरही या हवामान बदलाचा परिणाम जाणवत आहे. याबाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केलीय. कारण ‘टि मॅास्किटो बग’ या किटकाला सध्याचे वातावरण पोषक असल्यानेच हा बदल होत आहे. कडूलिंबाची झाडेही देखील सुकू लागली आहेत तर काजू, मोहगणी, द्राक्ष, पेरु यांनाही फटका बसत आहे.

वातावरणातील बदलाचा परिणाम यंदा सर्वच पिकांवर झाला आहे. इथपर्यंत ठिक होते. यामुळे खरिपातील उत्पादन तर घटले आहेच पण रब्बी हंगामातील पिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेती व्यवसायच अडचणीत आला आहे. असे असताना विदर्भ आणि दक्षिण भारतामध्ये झाडेदखील सुकत आहेत. त्यामुळे एकच चिंता व्यक्त होत आहे.

काय आहे टि-मॅस्किटो किटक

टि- मॅास्किटो किटक हा साधारणत: चहा या वनस्पतीवर आढळून येतो. मात्र, सध्याच्या हवामानातील बदलामुळे याचे प्रमाण वाढले असून हा किटक आता झाडेही मारायला लागला आहे. त्याच बरोबर सध्या बहरात असलेल्या काजू, द्राक्ष, पेरु यावरही याचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, कडूलिंबाला या किटकाने लक्ष केले आहे.

झाडे वाळण्याचे काय आहे नेमके कारण?

टि-मॅास्किटो हा विषारी द्रव्य सोडणारा किटक आहे. हा किटक झाडाची कोवळी पाने अन्यथा शेंड्यामधून रस पितो. मात्र, या दरम्यान ते लाळेद्वारे विषारी द्रव्यही सोडतात. त्यामुळे झाडाच्या फांद्याला जखम होते व त्यातून गोंद बाहेर निघतो. या भागावरच नंतर बुरशी तयार होते. त्यामुळे झाडाच्या मुळातील अन्नद्रव्य ही पाने आणि फांद्यापर्यंत पोहचतच नाहीत. या कारणामुळेच झाडे ही सुकू लागली आहेत. एवढेच नाही तर पूर्ण झाडे सुकून ती मृत होत असल्याचेही डॅा. पी.बी. मेश्राम यांनी सांगितले आहे.

काय आहे उपाययोजना?

प्रोफेनफॅास हे 20 मिलीसोबत बाविस्टीन किंवा कार्बेडॅझिन पावडर 20 ग्रॅम यांचे 10 लिटर पाण्यात मिश्रण करावे. हे मिश्रण ज्या झाडावर या किटकाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यावर दूरवरूनच फवारावे लागणार आहे. तर उरलेले मिश्रण हे आळे तयार करुन झाडाच्या बुंध्याजवळ टाकावे त्यामुळे बुरशी नियंत्रणात येणार आहे.

संबंधित बातम्या :

विज तोडणीवरुन मनसे आक्रमक, तर अधिकाऱ्यांना झाडाला बांधूनच..!

पिक विमा कंपन्यांच वागणं बरं नव्हं..! थेट केंद्र सरकारच्या योजनेवरच परिणाम

डाळिंबापेक्षाही टोमॅटो महाग, केव्हा मिळणार दिलासा? केंद्र सरकारनेच सांगितला तोडगा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI