Nanded : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, पीक पध्दतीमध्ये बदल करुनही नापिकी कायम

वाढते कर्ज आणि नापिकी ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्यासाठी हनुमंत सोळंके यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. उत्पादन वाढवून कर्ज फेडावे असे त्यांनी नियोजन केले होते. पण निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठत शेतीमालाचे कवडीमोल दर यामुळे कर्ज फेडण्याचे तर लांबच पण कर्जाचा डोंगर वाढतच गेला. घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून होते.

Nanded : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या, पीक पध्दतीमध्ये बदल करुनही नापिकी कायम
शेतकरी आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 3:57 PM

नांदेड : काळाच्या ओघात शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांकडून (Crop Change) एक ना अनेक प्रयोग केले जातात पण (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा बेभरवश्याचे (Agricultural goods) शेतीमालाचे दर यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ह्या कायम आहेत. अशीच प्रतिकूल परस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील दुगांव येथील शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 45 वर्षीय हनुमंत सोळंके हे सकाळच्या सत्रातील कामे करण्यासाठी शेतामध्ये गेले होते. मात्र, ते बराच वेळ घरी परतले नाहीत. शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्यावर ही घटना समोर आली आहे.

कर्जाचा बोजा त्यात यंदा नापिकी

वाढते कर्ज आणि नापिकी ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्यासाठी हनुमंत सोळंके यांनी बॅंकेकडून कर्ज घेतले होते. उत्पादन वाढवून कर्ज फेडावे असे त्यांनी नियोजन केले होते. पण निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठत शेतीमालाचे कवडीमोल दर यामुळे कर्ज फेडण्याचे तर लांबच पण कर्जाचा डोंगर वाढतच गेला. घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. आता कर्ज फेडण्यासाठी दुसरा कोणता पर्यायही त्यांच्याजवळ नव्हता. त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

शेतीकामासाठी गेलेले सोळंके परलेच नाहीत

सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. सकाळच्या सत्रातील कामे करण्यासाठी शेतात जात असल्याचे हनुमंत सोळंके यांनी कुटुंबातील सदस्यांना सांगितले होते. त्यानंतर ते बराच वेळ घराकडे फिरकले नाहीत. सध्या शेतीकामे सुरु असल्याने त्यामध्येच ते व्यस्त असतील असाच सर्वांचा समज झाला पण सकाळी 10 च्या दरम्यान शिवारातील शेतकऱ्यांना हनुमंत यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला मृत अवस्थेत दिसला. शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती हनुमंत सोळंके यांच्या कुटुंबियांना दिली.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून कर्जाच्या विवंचनेत

बॅंक तसेच खासगी सावकराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी याची चिंता हनुमंतराव यांना होती. नापिकीमुळे पदरी काही उत्पादन तर पडले नाही शिवाय अधिकचा खर्च झाला होता. भविष्यात का होईना कर्ज फेडायचे कसे याच काळजीत ते गेल्या काही दिवसांपासून होते. अखेर त्यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्राच संपवली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.