AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अडीच हजार हेक्टरावरील ऊस भुईसपाट, बागायतदार शेतकरीही अडचणीत

ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणऱ्या मांजरा नदी काठच्या ऊसालाही वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा फटका बसलेला आहे. जिल्ह्यातील 59 गावच्या शिवारातील ऊस हा भुईसपाट झाला आहे. त्यामुळे खरिपातील नगदी पिकाबरोबरच बागायती क्षेत्रालाचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अडीच हजार हेक्टरावरील ऊस भुईसपाट, बागायतदार शेतकरीही अडचणीत
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 5:53 PM
Share

लातुर : ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणऱ्या मांजरा नदी काठच्या ऊसालाही वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा फटका बसलेला आहे. जिल्ह्यातील 59 गावच्या शिवारातील ऊस हा भुईसपाट झाला आहे. त्यामुळे खरिपातील नगदी पिकाबरोबरच बागायती क्षेत्रालाचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. औसा, रेणापूर, लातूर या तालुक्यांमध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गतवर्षी तर समाधानकारक पाऊस झाल्याने ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. शिवाय अनुकूल वातादरण असल्याने ऊसाची वाढही जोमात होती. मात्र, चार दिवस झालेल्या पावसामुळे उभा ऊस आडवा झाला आहे. नुकसानीनंतर कृषी विभागाच्यावतीने पाहणी करुन अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये लातुर तालुक्यात 47 गावातील 1 हजार 938 हेक्टरावरील नुकसान झाले आहे. तर रेणापूर तालुक्यातील 10 तर औसा तालुक्यातील 2 गावातील ऊसाचे फड हे आडवे झाले आहेत.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होता. याचा परिणाम खरीपातील सोयाबीन, उडीद यावर झाला असला तरी ऊसाचेही उत्पादन घटण्याची शक्यता वर्तीवली जात आहे. 8 सप्टेंबर रोजी कृषी विभागाच्यावतीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली जात होती. शिवाय आगामी काळात उर्वरीत ठिकाणचीही पाहणी केली जाणार असल्याचे कृषी अधिकारी बी.व्ही. वीर यांनी सांगितले आहे.

सोयाबीनपेक्षा ऊसाचे अधिकचे नुकसान

लातुर तालुक्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याहे मांजरा नदी काठच्या परीसरात ऊसाची लागवड वाढली होती. गेल्या चार दिवसांपासून याच पट्ट्यात अधिकचा पाऊस झाल्याने ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. तर सोयाबीनचे केवळ 5 हेक्टर नुकसान दाखिवल्याहे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती कळीवणे गरजेचे

जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने थैमान घातल्याने सोयाबीनसह बागायत क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ही माहिती ठरवून दिलेल्या अॅपद्वारे जिल्हा प्रशासनाला कळविणे आवश्यक आहे. त्यानंतरच नुकसानीची मदत मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सलग दुसऱ्या वर्षी ऊस उत्पादकाचे नुकसान

गतवर्षी चांगला दर असतानाही केवळ ऊस कारखान्यावर घालण्याच्या प्रसंगी वादळी वारे सुटल्याने ऊसाची पडझड झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. गतवर्षीचे नुकसान भरून काढण्यासाठी ऊसाचे क्षेत्र शेतकऱ्यांनी वाढवले. यंदाही ऐन वेळीच पावसाची अवकृपा झाली आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

इतरही बातम्या :

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे समर्थकांत जोरदार राडा, 6 गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा

अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वरच्या व्हॅल्युएशनचे कागद लोकांसमोर का ठेवत नाहीत? किरीट सोमय्यांचा सवाल

पंतप्रधान मोदींच्या 71 व्या वाढदिवसासाठी भाजपचा मास्टरप्लॅन तयार, अभियानातले 11 मोठे मुद्दे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.