AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सणासुदीच्या काळात मोहरी तेलाचे भाव वाढले, कंपन्या विक्रमी दराने करताहेत खरेदी

सरकारने बुधवारी रात्री आयात शुल्क मूल्याच्या गणनेत डॉलर-रुपया विनिमय दर कमी करून 74.40 रुपये प्रति डॉलर केला. सरकारच्या या निर्णयामुळे कच्च्या पाम तेलाची आयात शुल्क किंमत 20,807 रुपये प्रति टन झाली आहे.

सणासुदीच्या काळात मोहरी तेलाचे भाव वाढले, कंपन्या विक्रमी दराने करताहेत खरेदी
सणासुदीच्या काळात मोहरी तेलाचे भाव वाढले
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Sep 18, 2021 | 12:29 AM
Share

नवी दिल्ली : देशातील खाद्य तेलांच्या आयात शुल्कातील वाढीमुळे परदेशात खाद्यतेलांच्या किमती कमी होत असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम दिल्ली तेल-तेलबिया बाजारातही दिसून आला. सोयाबीन, कच्चे पाम तेल आणि पामोलिन तेलाच्या किमती शुक्रवारी कमी झाल्या. दुसरीकडे, मागणी वाढल्याने मोहरीचे तेल आणि शेंगदाणे तेल, तेलबिया आणि कापूस तेलाचे भाव सुधारले. (Mustard oil prices rose during the festive season, with companies buying at record rates)

सरकारने बुधवारी रात्री आयात शुल्क मूल्याच्या गणनेत डॉलर-रुपया विनिमय दर कमी करून 74.40 रुपये प्रति डॉलर केला. सरकारच्या या निर्णयामुळे कच्च्या पाम तेलाची आयात शुल्क किंमत 20,807 रुपये प्रति टन झाली आहे. त्यात प्रति टन 126 रुपयांची वाढ झाली, तर सोयाबीन डिगॅम तेलाची आयात शुल्क किंमत 24,453 रुपये प्रति टन आणि पामोलिन तेलाची किंमत 30,933 रुपये प्रति टन होती.

बहुतेक तेलाच्या किमती घसरल्या

विनिमय दर वाढल्यामुळे त्यांच्या किमती अनुक्रमे 148 आणि 187 रुपये प्रति टन वाढल्या. यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी सरकारने या तेलांच्या आयात शुल्कात वाढ केली होती. आता शुल्क मूल्याच्या गणनामध्ये विनिमय दर वाढवण्यात आला आहे. या वाढीनंतर खाद्यतेलांच्या किमती परदेशात घसरु लागल्या, ज्यामुळे येथे सोयाबीन तेल, सीपीओ आणि पामोलिन तेलाच्या किमती घसरणीसह बंद झाल्या. मलेशिया एक्सचेंजमध्ये 1.7 टक्के नुकसान झाले, तर शिकागो एक्सचेंजमध्ये गुरुवारी रात्री दोन टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर सध्या 1.5 टक्के घसरण दिसून आली.

सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यामुळे मोहरीच्या तेलाच्या किमतीत वाढ

मोहरीच्या कमी उपलब्धतेमुळे, मोठ्या ब्रँड कंपन्या राजस्थानमधील कोटा येथून मोहरीचे कच्चे घाणी तेल 18,300 रुपये क्विंटल (जीएसटी वगळता) भावाने विकत घेत आहेत, जे ते पूर्वी कधीही करत नव्हते. मोहरीला सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीमुळे त्याच्या तेलाच्या किमतीत सुधारणा दिसून आली. वायदा व्यापारात 120 रुपये क्विंटलचे नुकसान होऊनही, मोहरीच्या किमती स्पॉट मार्केटमध्ये मागील स्तरावर बंद झाल्या. देशातील मंडईंमध्ये मोहरीची आवक 2.25 लाख पिशव्यांवरून दोन लाख पिशव्यांवर आली आहे. दुसरीकडे, मागणी वाढल्यामुळे शेंगदाणे तेल, तेलबिया आणि कापूस बियाण्याच्या किंमतीतही सुधारणा दिसून आली. (Mustard oil prices rose during the festive season, with companies buying at record rates)

इतर बातम्या

कुछ खास है हम सभी में, चर्चेत असलेली कॅडबरीची जाहिरात पाहिलीत का? पहाल तर म्हणाल, वाह वाह!

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचं ‘सेवा व समर्पण’ अभियान, कुठे कोणता उपक्रम?

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...