कृषी क्षेत्रात शास्त्रज्ञांची कमतरता; आयसीएआरमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त

सध्याच्या घडीला भारतीय कृषी संशोधन परिषदेत (आयसीएआर) शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचार्‍यांची 3815 पदे रिक्त आहेत. (Shortage of scientists in agriculture; Large number of vacancies in ICAR)

  • Updated On - 8:07 am, Thu, 18 March 21 Edited By: Rohit Dhamnaskar Follow us -
कृषी क्षेत्रात शास्त्रज्ञांची कमतरता; आयसीएआरमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त
कृषी क्षेत्रात शास्त्रज्ञांची कमतरता; आयसीएआरमध्ये मोठ्या प्रमाण पदे रिक्त

नवी दिल्ली : शेती विकासामध्ये शेतकर्‍यांसह शास्त्रज्ञांचेही मोठे योगदान आहे. शास्त्रज्ञांच्या मदतीमुळे हरितक्रांती शक्य झाली आहे. कृषी क्षेत्रात सुरू असलेल्या संशोधनामुळे शेती करणे आणखी सोपे झाले आहे. बियाणापासून बाजारापर्यंतची व्यवस्था शास्त्रज्ञांशिवाय अधुरी आहे. परंतु सध्याच्या घडीला भारतीय कृषी संशोधन परिषदेत (आयसीएआर) शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचार्‍यांची 3815 पदे रिक्त आहेत. कृषी शास्त्रज्ञाची 22.83 टक्के पदे तर तांत्रिक कर्मचाऱ्यांची 34 टक्के पदे भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. (Shortage of scientists in agriculture; Large number of vacancies in ICAR)

संशोधकांची कमतरता

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. याच दृष्टिकोनातून ते या मोहिमेवर विशेष लक्ष देऊन आहेत. दुसरीकडे, शेतीवर संशोधन करणार्‍या लोकांची मोठी कमतरता आहे. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की शास्त्रज्ञाशिवाय शेतीची प्रगती शक्य नाही. आयसीएआर ही शेतीसंबंधी संशोधन करणारी सर्वात मोठी संस्था आहे.

देशभर शास्त्रज्ञांची 1504 रिक्त पदे

देशभर परिषदेशी संबंधीत 103 संशोधन केंद्रे आहेत. त्यामध्ये 6586 कृषी शास्त्रज्ञ असले पाहिजेत, परंतु केवळ 5082 लोक या केंद्रांची जबाबदारी सांभाळत आहेत. या केंद्रांमध्ये एकूण 1504 पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे सध्या जे शास्त्रज्ञा काम करताहेत, त्यांच्यावर प्रचंड ताण पडत आहे.

तांत्रिक पदांवरही कामाचा ताण

आयसीएआरमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता शास्त्रज्ञापेक्षा खूपच जास्त आहे. तांत्रिक संवर्गातील एकूण 6756 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 2311 (34.20 टक्के) पदे रिक्त आहेत. म्हणजेच केवळ 4445 लोक तांत्रिक कामाची जबाबदारी सांभाळत आहेत.

सरकारने काय म्हणाले?

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले कि, पदे रिक्त होणे व त्याजागी भरती करणे ही एक सतत प्रक्रिया आहे. पद रिक्त असzdcv tते, तेव्हा ते पद भरण्यासाठी परिषद सर्वतोपरी प्रयत्न करते. कृषी शात्रज्ञ भरती मंडळ हे काम करते. रिक्त पदावर पात्र उमेदवार उपलब्ध होईल, यादृष्टीने परिषद लक्ष देऊन असते. तोमर यांच्या मते, संस्थांच्या प्राधान्यक्रमातील संशोधन कार्यावर कोणताही परिणाम होऊ नये याकडे आयसीएआरने गांभीर्याने लक्ष ठेवले आहे. राष्ट्रीय गरजांची पूर्तता करण्याच्या हेतूने संशोधन कार्यास प्राधान्य देण्यासाठी आयसीएआरमध्ये मानवी संसाधनांच्या चांगल्या तैनातीसह प्रभावी पावले उचलली गेली आहेत.

कृषी शास्रज्ञासाठी किमान पात्रता

आयसीएआरमध्ये शास्रज्ञ होण्यासाठी पूर्वी एमटेक आणि एमएससी ही किमान पात्रता होती. म्हणजेच किमान पात्रता संबंधित विषयात मास्टर डिग्री होती. ही किमान पात्रता पीएच. डी.पर्यंत वाढवाण्यात आली आहे. या निर्णयानंतर शास्त्रज्ञांची रिक्त पदे भरणे सोपे राहिले नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

जाणकार काय म्हणतात?

कृषी अर्थशास्त्रज्ञ दविंदर शर्मा म्हणतात की प्रत्येक क्षेत्रात शास्त्रज्ञांची भूमिका वाढली आहे. शेती क्षेत्रही यातून सुटलेले नाही. जर कृषी शास्त्रज्ञांची एक-चतुर्थांशपेक्षा पदे रिक्त राहत असतील, तर शेतीची प्रगती कशी होईल. सरकारने ही पदे लवकरात लवकर भरली पाहिजेत. रिक्त पदे वेळीच भरली तरच सध्या कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञांवरील कामाचा ताण कमी होईल व त्यांना चांगले संशोधन करता येईल. (Shortage of scientists in agriculture; Large number of vacancies in ICAR)

इतर बातम्या

’50 टक्क्यांची मर्यादा ओलांडणारी कोणतीही असामान्य स्थिती नाही’, मराठा आरक्षणावरुन सर्वोच्च न्यायालयात घमासान

कोरोनाचा विस्फोट! राज्यात नव्याने 23,179 रुग्ण सापडले

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI