Central Government : जनावरांवरील उपचार आता गावातच, केंद्राचा निधी राज्यांकडून अंमलबजावणी

महाराष्ट्र राज्य पशूधन विकास मंडळाकडे हा कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी राहणार आहे. यामध्ये पशूसंवर्धन विभागाकडून याकरिता निधीची तरतूद ही मंडळाकडूनच केली जाणार आहे. शिवाय मोठे जनावर आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी पशुचिकित्सालयापर्यंत घेऊन जाणे अडचणीचे ठरते. त्यामुळे मोबाईल व्हॅनद्वारे थेट बांधावर जाऊन उपचार करणे शक्य होणार आहे.

Central Government : जनावरांवरील उपचार आता गावातच, केंद्राचा निधी राज्यांकडून अंमलबजावणी
मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून जनावरांवर उपचार केले जाणार आहेत.
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 10:22 AM

नागपूर : आजही ग्रामीण भागात मंडळाच्या ठिकाणचे (Veterinary Hospital) पशूवैद्यकीय रुग्णालय वगळता गाव खेड्यात (Treatment of animals) जनावरांवरील उपचाराकरिता योग्य ती यंत्रणा नाही. आता मात्र, गावातच जनावरांवर उपचार करण्यासाठी 80 (Mobile Van) मोबाईल व्हॅन चिकित्सालय पर्याय राज्यात उपलब्ध केल्या जाणार आहेत. शिवाय प्रस्तावित कॉल सेंटरवर पशूपालकांनी संपर्क साधल्यानंतर ही सुविधा मिळणार आहे. याकरिता केंद्र सरकारकडून निधीचे हस्तांतरण महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे करण्यात आला आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून पशूपालकांच्या अनेक समस्या मार्गी लागणार आहेत शिवाय जनावरांवर वेळीच उपचार होणार आहेत. निधीची उपलब्धता होताच राज्या सरकारला या निधीचे वितरण करावे लागणार आहे.

मोबाईल व्हॅन च्या माध्यमातून हे उपचार

महाराष्ट्र राज्य पशूधन विकास मंडळाकडे हा कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी राहणार आहे. यामध्ये पशूसंवर्धन विभागाकडून याकरिता निधीची तरतूद ही मंडळाकडूनच केली जाणार आहे. शिवाय मोठे जनावर आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी पशुचिकित्सालयापर्यंत घेऊन जाणे अडचणीचे ठरते. त्यामुळे मोबाईल व्हॅनद्वारे थेट बांधावर जाऊन उपचार करणे शक्य होणार आहे. केवळ वेळेत आणि जागेवर सेवा मिळवून देण्याच्या अनुशंगाने ही सुविधा देण्यात आली आहे.

वर्षभरात सुरु होणार कॉलसेंटर

केंद्र सरकारकडून मोबाईल व्हॅन आणि कॉल सेंटरसाठी निधी मंडळाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे वर्षभरात पुणे किंवा नागपूर या ठिकाणी कॉल सेंटर उभारण्यात येणार आहे. संबंधित कॉलसेंटरवर संपर्क साधल्यानंतर पशूपालकाच्या गावात ही मोबाईल व्हॅन पोहचणार आहे. कमी वेळेत सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. राज्यात सध्या 4 हजार 448 पशुचिकित्सालये आहेत. येत्या वर्षभरात या सुविधेचा लाभ पशूपालकांना घेता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

अशी मिळणार पशुपालकांना सेवा

राज्यात एकूण 4 हजार 448 पशुचिकित्सालये आहेत. राज्यात उभारल्या जाणाऱ्या 80 मोबाईल व्हॅन चिकित्सालयाकरिता प्रत्येकी 16 लाख रुपये देण्याचे ठरविण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक मोबाईल व्हॅन दिली जाणार आहे. त्यामुळे मोबाईल व्हॅनला तालुका कव्हर करणे सहज शक्य होणार आहे. प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असणारी यंत्रणा या अत्याधुनिक मोबाईल व्हॅनमध्ये असणार आहे.

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.