भात शेतीला धोक्याची घंटा, आवश्यकता योग्य रणनितीची

भारतीय शेती ही मान्सूनवर आधारित आहे. शिवाय निसर्गाचा लहरीपणामुळे उत्पादन हाती पडेल असे नाही. यातच भविष्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत त्यामुळे देशात भातशेती ही धोक्यात असून योग्य वेळा योग्य रणनिती करणे आवश्यक झाले आहे.

भात शेतीला धोक्याची घंटा, आवश्यकता योग्य रणनितीची
संग्रहीत छायिचित्र

मुंबई : भारतीय शेती ही मान्सूनवर आधारित आहे. शिवाय निसर्गाचा लहरीपणामुळे उत्पादन हाती पडेल असे नाही. यातच भविष्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे संकेत देण्यात आले आहेत त्यामुळे देशात भातशेती ही धोक्यात असून योग्य वेळी तांदळाबाबची रणनिती करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा देशातील तांदळाचे उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत रेटिंग एजन्सी इन्फोमेरिक्स व्हॅल्यूएशन अँड रेटिंगने अहवाल सादर केला आहे. नैसर्गिकचक्रबरोबरच सरकारचे धोरण, तांदूळ प्रक्रिया कंपन्यांची भूमिका यामुळे उत्पादन वाढीचे अव्हान समोर उभे राहणार आहे.

रेटिंग एजन्सी इन्फोमेरिक्स व्हॅल्यूएशन अँड रेटिंग चा अहवाल काय सांगतो

तांदूळ प्रक्रिया कंपन्यांची वाढती संख्या आणि वाढती निर्यात यांचा भारतीय तांदूळ उद्योगावर सकारात्मक परिणाम झाला असला तरी सरकारी उपक्रमांच्या मर्यादा कमी करण्याचे आणि पावसाळी अनिश्चिततेवर अवलंबून राहण्याचे मोठे अव्हान असणार आहे. याकरिता योग्य रणनिती करुन त्यानुसार मार्गक्रमण गरजेचे आहे. नवीन प्रणाली, तंत्रज्ञान आणि तांदळाच्या बियाण्यांच्या नवीन प्रकारांवर लक्ष केंद्रित करून सर्वसमावेशक तांदूळ धोरणाची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वाढत्या कर्जाचाही परिणाम

अहवालात म्हटले आहे की तांदळाचे उत्पादन विविध जोखमींनी वेढलेले आहे. खतांच्या वाढत्या किंमती, पाण्याची घटती पातळी, बाजार भावातील अनिश्चितता इत्यादीचा धोका उत्पादकांना यामध्ये आहे. शिवाय कृषी यंत्रणेचे वाढते भाडे, खराब वाहतूक, निकृष्ट सुविधा आणि वेळेत वाहतूक साधनसामुग्री मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

या तीन गोष्टींचाही उत्पादनावर परिणाम

देशातील तांदूळ क्षेत्राला तीन मुख्य धोके आहेत – कंटेनरची कमतरता, कमी पाऊस आणि कमी किंमत इत्यादींमुळे सुमारे उत्पादनात घट होत आहे. तांदळाची वाहतूक ही कंटेनरच्या माध्यमातून केली जाते मात्र, अनेक कंटेनर हे बंदरावरच पडून आहेत. त्यामुळे बासमती तांदळाच्या निर्यातीचे मोठे नुकसान झाले आहे. अनियमित पावसामुळे पीक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कमी पावसाच्या भीतीने यावर्षी शेतकऱ्यांनी इतर पिकाची लागवड केली आहे. हे सर्व असले तरी भारतीय हवामान खात्याने भविष्यात मान्सून हा कमीच राहणार असल्याचे सांगितले आहे.

किमान आधारभूत किंमतीचाही लाभ मिळू शकत नाही

खासगी व्यापाऱ्यांचा कमी सहभाग, कमी पायाभूत सुविधा मिळत नसल्याने दिवसेंदिवस उत्पादन हे घटत आहे. 2013 साली उत्पन्न 17% होते तर 2019 साली 2.7% टक्क्यावर आले आहे. अहवालात म्हटले आहे की, जमीन हक्क आणि जमिनीची मालकी, अन्न सुरक्षा, राजकीय स्थैर्य, नैसर्गिक संकटात संरक्षण आणि कृषी विविधीकरण या व्यापक प्रश्नावरच तांदळाचे उत्पादन अवलंबून आहे. भारतीय शेती पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे तांदूळ उत्पादनातील धोके लक्षात घेता पीक विमा, आधारभूत किंमत याबाबत ठोस भूमिका असणे आवश्यक आहे. अन्यथा दिवसेंदिवस उत्पादन घटणार असल्याचा अंदाज रेटिंग एजन्सी इन्फोमेरिक्स व्हॅल्यूएशन अँड रेटिंगने व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्याला हमीभावाचा आधार, राज्यात मूग-उडदाच्या खरेदी केंद्राला परवानगी

सोयाबीनची आवक वाढली तर दर घसरले, पावसाचा परिणाम सोयाबीन पीकावर

दोन वर्षांपासून रखडलेला पीक विमा मिळणार पुढच्या वर्षी, उच्च न्यायालयाचे आदेश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI